Lok Sabha Poll 2024 : आता तुम्ही तुमचे दिवस मोजा : खासदार सुप्रिया सुळे

मोठा भाऊ म्हणून तुमचा सन्मान केला, तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा होती. मात्र आता आमची लढाई घाणेरड्या मानसिकतेच्या विरोधात आहे.
supriya sule on ajit pawar lok sabha election criticism maharashtra politics
supriya sule on ajit pawar lok sabha election criticism maharashtra politicsSakal

काटेवाडी : मोठा भाऊ म्हणून तुमचा सन्मान केला, तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा होती. मात्र आता आमची लढाई घाणेरड्या मानसिकतेच्या विरोधात आहे. ते म्हणाले होते समोरची येतील भावुक होतील व शेवटची इलेक्शन आहे असे सांगतील.

मला सर्वात जास्त वाईट या गोष्टीचे वाटले. तुम्ही आमचे दिवस मोजू नका आता तुम्ही तुमचे दिवस मोजा, अशा आक्रमक शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली.

बारामती येथे लेंडी पट्टा जुना मोरगाव रस्ता येथील मैदानावर रविवारी (ता.५) खासदार सुप्रिया सुळे यांची सांगता सभा पार पडली. यावेळी त्या बोलत होत्या. त्यापुढे म्हणाल्या, तुम्हाला कुटुंबाची फिकीर नाही.

मग तुमच्यावर मी माझे अश्रू वाया का घालवू. लोकसभेला लढायची कुणाची तयारी नव्हती. लोकसभेचे तिकीट फक्त मी मागितले. तुम्ही सांगितले असते तर दिले असते. मात्र हिसकावून घेतले.

या घाणेरड्या मानसिकतेच्या विरोधात आमची लढाई आहे. तुम्ही ज्यांना घाबरताना त्यांच्यासमोर डंके की चोट पे मी उभी राहून भाषण करते. त्यामुळे त्यांची भीती मला नाही, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांचा समाचार घेतला.

यावेळी खासदार अमोल कोल्हे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नक्कल करत ते म्हणाले, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना दम देण्यापेक्षा तुमचा हाच दम खताच्या किमती, दुधाचा दर, कांद्यावरील निर्यात शुल्क या प्रश्नांसाठी वापरावा. बारामती मध्ये मी अनेक ठिकाणी फिरलो.

मला सगळीकडे सिर्फ तुम सिनेमाचे पोस्टर दिसले. अशा उपरोधिक शब्दांमध्ये खासदार अमोल कोल्हे यांनी बारामती शहरात महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या लागलेल्या पोस्टरवर मिश्किल टिप्पणी केली.

तर काँग्रेस नेते सुनील केदार म्हणाले, शरद पवार हे महाराष्ट्राचा आत्मा आहेत. विदर्भात फार फार तर दोन जागा भाजपला मिळतील. त्यापेक्षा जास्त जागा त्यांना मिळणार नाहीत. यावेळी माजी खासदार फौजिया खान, माजी गृहमंत्री अनिल देशमुख,

आमदार अशोक पवार, आमदार सुनील केदार, आमदार वंदना चव्हाण, आमदार रोहित पवार, भूषणराजे होळकर, प्रतिभाकाकी पवार, अंकुश काकडे, श्रीनिवास पवार, रणजीत पवार, सुनंदा पवार, शर्मिला पवार, शुभांगी पवार, सई पवार, कुंती पवार, सदानंद सुळे, मेहबूब शेख, विकास लवांडे, सक्षणा सलगर, युगेंद्र पवार, रेवती सुळे, विजय सुळे आदी उपस्थित होते.

रोहित पवार झाले भावुक....

यावेळी आमदार रोहित पवार ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबाबत बोलताना भावुक झाले. ते म्हणाले, मलिदा गॅंगमधील एक माळेगावमध्ये मडकी फोडतो. मडके केव्हा फोडले जाते हे आपल्याला माहित आहे. च्या खालच्या पातळीवर हे लोक आले आहेत.

ज्यावेळी पक्ष फुटला तेव्हा आम्ही साहेबांकडे पाहत होतो. टीव्हीवर ते बातम्या पाहत होते. मात्र त्यांच्या चेहऱ्यावर यत्किंचितही हावभाव दिसले नाहीत. ते आम्हाला एवढेच म्हणाले, काळजी करू नका. आपण नवीन पिढी तयार करू.

आणि जोपर्यंत नवीन पिढी जबाबदारी घेण्या इतपत सक्षम होत नाही तोपर्यंत मी माझे डोळे मिटणार नाही, यावेळी रोहित पवार गहिवरले. यावर उपस्थितांनी दादा रडायचे नाही तर लढायचे आहे असे सांगितले. यावर रोहित पवार पुढे म्हणाले, साहेब ते वक्तव्य तुम्ही केलं पण कृपा करून असं वक्तव्य पुन्हा करू नका.

तुम्ही आमचा व महाराष्ट्राचा जीव आहात. आम्ही बारामतीकर म्हणून सर्व कुटुंब तुमच्या सोबत आहोत. दरम्यान आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला, इथून पुढच्या प्रत्येक निवडणुकीत तुम्हाला गुडघ्यावर आणल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देखील त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिला.

यावेळी बोलताना भूषणसिंहराजे होळकर म्हणाले, याच बारामती मध्ये धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ असा शब्द भाजपच्या नेत्यांनी दिला होता. मात्र दहा वर्षे झाली तरी तो त्यांना पळता आला नाही.

त्यांनी सर्व समाजाची फसवणूक केली. आज आपला स्वाभिमान वाचवायचा असेल तर आपल्याला पुन्हा एकदा पवार साहेबांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, असे होळकर म्हणाले. यावेळी भूषणसिंहराजे होळकर यांनी धनगर समाजाच्या वतीने काठी व घोंगडे देऊन ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा सत्कार केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com