Supriya Sule : पुण्यातील नवले पुलावरील अपघाताचा मुद्या संसदेत; सुप्रिया सुळे म्हणाल्या... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Supriya Sule : पुण्यातील नवले पुलावरील अपघाताचा मुद्या संसदेत;  सुप्रिया सुळे म्हणाल्या...

Supriya Sule : पुण्यातील नवले पुलावरील अपघाताचा मुद्या संसदेत; सुप्रिया सुळे म्हणाल्या...

नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी पुण्याच्या नऱ्हे भागातील नवले पुलाचा मुद्दा लोकसभेत उपस्थित केला. यावेळी त्यांनी राष्ट्रीय महामार्गाविषयी सवाल उपस्थित केले.

हेही वाचा: PUNE: राज्यपालांविरोधात वातावरण तापलं; आता पुण्यातही बंदची हाक

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ऱस्ते सुरक्षेचं मोठं आव्हान आपल्या देशासमोर आहे. माझ्या मतदार संघातील नवले ब्रीजवर मोठ्या प्रमाणात अपघात होत आहे. काही दिवसांपूर्वीच झालेल्या अपघातात ४० वाहनांचे नुकसान झाले होते. २०२१ पासून अनेक लोक जखमी झाले आहेत. नवले पूल अपघातामुळे ब्लॅकस्पॉट बनला आहे. येथे सर्व्हिस रोडची गरज आहे. लोकांनी वाहतुकीचे नियम पाळायला हवेच तसेच हायवे पोलिसांच्या उपस्थितीची गरज असल्याचंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.

हेही वाचा: Karnataka Border Dispute : गरज पडली तर...; अन् राज ठाकरे मोदी आणि शिंदे सरकारवर भडकले!

मुंबई - बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील नवले पुल परिसरातील भूमकर पुलावर अपघातांची मालिका सुरूच असून दररोज अपघात होतायत. या अपघातांमध्ये वाहनांचे मोठे नुकसान होत आहे. नवले पुलाचा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजत आहे. मात्र त्यावर अद्याप तोडगा निघाला नाही. मात्र सुप्रिया सुळे यांनी संसदेत हा मुद्दा उपस्थित केल्याने यावर तोडगा निघेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा - Sextortion: भारत ही सेक्सटॉर्शनची जागतिक राजधानी होतेय का?