
बारामती : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा निर्णय माझ्या एकटीचा नाही, पवारसाहेब जो काही निर्णय घेतात मार्गदर्शन करतात, ते लोकशाही पध्दतीनेच होते, त्या मुळे सशक्त लोकशाहीमध्ये ज्या पध्दतीने शेवटच्या कार्यकर्त्याला विश्वासात घेऊन निर्णय घेतले जातात, त्याच पध्दतीने हा निर्णय देखील कार्यकर्त्यांना काय वाटते याचा विचार करुनच घेतला जाईल, आम्ही आमच्या स्तरावर एकतर्फी निर्णय घेणार नाही, अशी भूमिका खासदार सुप्रिया सुळे यांनी मांडली.