संसद चालवायची होती तर तेव्हा उपोषण का नाही केलं - सुप्रिया सुळे

गुरुवार, 12 एप्रिल 2018

पुणे- संसद चालवायची होती तर अधिवेशन सुरू असताना का उपोषण नाही केलं, जे झालंय त्यावर उपोषण करून काय उपयोग अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी 'हल्लाबोल'च्या पुण्याच्या सभेत केली.

पुणे- संसद चालवायची होती तर अधिवेशन सुरू असताना का उपोषण नाही केलं, जे झालंय त्यावर उपोषण करून काय उपयोग अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी 'हल्लाबोल'च्या पुण्याच्या सभेत केली.

काँग्रेस व विरोधकांनी गोंधळ करून संसद अधिवेशन एक दिवसही चालू न दिल्याच्या निषेधार्थ सत्तारूढ भारतीय जनता पक्षाचे सर्व खासदार, आमदार व पदाधिकारी आज(गुरुवार) एक दिवसाचा उपवास करणार आहेत. पुण्यातही भाजपचे पदाधिकारी उपोषण करणार आहेत. त्यावर टीका करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, उपोषण करायचं होतं तर निदान बारा तासांच करायचं, दुपारी उपोषण करणार आणि संध्याकाळी वाडेश्वरला जाणार त्याला काही अर्थ नाही.

'स्मार्ट सिटी' बाबत बोलताना त्या म्हणाल्या, सरकारनं स्मार्ट सिटी साठी बालेवाडीची निवड केली परंतु बालेवाडी अजित दादांनी आधीच 'स्मार्ट' केलं आहे. पाणी, रस्ते, शाळा, हॉस्पिटल सगळं काही तिथे आहे. स्मार्ट सिटी साठी सरकारला निवडायचंच आहे तर बिब्वेवाडी घ्या बालेवाडी नको असेही त्या म्हणाल्या.

आपण कमी पडलो असेल म्हणून कदाचित 2014 ला जनतेने आपल्याला नाकारलं असे बोलताना येत्या काळात हा महाराष्ट्र अजित दादांच्या नेतृत्वाखाली पुढे जाणार आहे अशी अशाही सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.

Web Title: supriya sule speaks about bjp day long fast over disruptions during Session of Parliament