esakal | पुरामुळे बाधित झालेल्या भागाची सुप्रिया सुळे यांच्याकडून पाहणी
sakal

बोलून बातमी शोधा

supriya sule.

बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत. 

पुरामुळे बाधित झालेल्या भागाची सुप्रिया सुळे यांच्याकडून पाहणी

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

उंडवडी- अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी केंद्र सराकारच्या पथकाने पाहणी करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी. त्यासाठी मी स्व:ता पाठपुरावा करणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.  कऱ्हावागज ( ता. बारामती) येथे नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेती व कऱ्हानदी पात्रातील पूलाची पाहणी खासदार सुळे यांनी केली. यावेळी त्या ग्रामस्थांशी बोलत होत्या. 

जिल्हा परिषद सदस्य रोहिणी तावरे, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, बारामती पंचायत समितीचे उपसभापती प्रदीप धापटे , सरपंच मंगल नाळे , उपसरपंच आप्पा सांगळे, माजी सरपंच नितीन मुलमुले, पोपट गावडे, शमीम खान आदींसह विविध विभागाचे अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. 

घोड नदीत वाहून जाणाऱ्या तरुणाला वाचवले

यावेळी सौ. सुळे  पुढे म्हणाल्या , नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी काळजी करु नये. आम्ही शेतकऱ्यांना सोबत आहोत. बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत. 

यावेळी येथील पुराच्या पाण्याचा फटका बसलेल्या कुटूंबियानी खासदार सुळे यांच्याकडे अनेकदा नदीला पुर आल्यानंतर घरात पाणी घुसून नुकसान होत असल्याने सबंधित कुटूंबाना शासनाकडून पुनर्वसन करुन योग्य त्या ठिकाणी घरे बांधून मिळावीत, अशी मागणी केली.