
Pune Politics: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी पुण्यात वांजळे कुटुंबियांची भेट घेतली. या भेटीमुळे अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची धडधड वाढली आहे. त्याचं कारण वांजळे कुटुंबातील दोन सदस्य सद्य घडीला या दोन वेगवेगळ्या पक्षात आहेत.