

Pune Success story
esakal
जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शन असेल तर सामान्य घरातील मुलगाही प्रशासनात उच्च पदावर पोहोचू शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे कराडचा सुरज पडवळ. सुरुवातीला राज्य कर विभागात एसटीआय (State Tax Inspector) म्हणून कार्यरत असलेल्या सुरज यांनी आणखी उंच भरारी घेत महाराष्ट्र राज्य सेवेतून एसएसटी (State Service – Class One) या अधिकाऱ्याच्या पदावर निवड मिळवली आहे. विशेष म्हणजे, सुरज यांच्या यशामागे त्यांच्या रूममेट मित्रांची मोठी प्रेरणा आहे. त्यांच्या सर्व रूममेट मंडळींपैकी अनेक आता विविध सरकारी विभागात अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.