

गावठी दारूविक्रीवर
सुरवडीमध्ये कारवाई
दुधेबावी, ता. ११ : सुरवडी गावच्या हद्दीत बेकायदा गावठी दारूविक्री करणाऱ्यावर फलटण ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. रेल्वे स्टेशन परिसरातील झाडाखाली अभय पितांबर राठोड (रा. सुरवडी, ता. फलटण) हा गावठी दारूची बेकायदा विक्री करत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांना मिळाली. त्याठिकाणी छापा टाकला असता अभय राठोड दारूविक्री करताना आढळून आला. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून सहा हजार ७५० रुपये किमतीची गावठी दारू जप्त केली.
---------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.