सतीश चांभारे यांना प्रशासकीय सेवा पुरस्कार

सतीश चांभारे यांना 
प्रशासकीय सेवा पुरस्कार
Published on: 

चाकण, ता. ३ ः दिवंगत आमदार सुरेश ‍गोरे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे (सुपेकर) यांना ‘स्व. सुरेशभाऊ गोरे सहकार प्रशासकीय सेवा पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले.
विधान परिषदेच्या माजी उपसभापती निलम गोऱ्हे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार बाबाजी काळे, चाकण नगर परिषदेच्या नगराध्यक्षा मनीषा गोरे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. चांभारे यांनी सहकार क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल हा कृतज्ञता सन्मान पुरस्कार स्व. आमदार सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठानच्या वतीने त्यांना देण्यात आला. प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी सहकार प्रशासन विभागात उत्कृष्ट काम करणाऱ्याला हा पुरस्कार दिला जातो.
यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण समितीचे सदस्य नितीन गोरे, पंचायत समितीच्या सभापती गौरी मुऱ्हे, खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक राक्षे, माजी सभापती व जिल्हा परिषदेचे गटनेते विजय शिंदे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका ज्योती अरगडे, शिवसेना नेते प्रकाश वाडेकर, बाजार समितीचे संचालक माणिक गोरे, केशव अरगडे, ॲड. पोपटराव तांबे यांसह तालुक्यातील विविध मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.
खेड तालुक्याच्या डोंगराळ पश्चिम भागातील सुपे -सातकरवाडी गावचे सुपुत्र, उच्च शिक्षित असलेले सतीश चांभारे यांनी १९९०पासून ते २०१९ पर्यंत खेड बाजार समितीत सचिव पदाचा भार संभाळला. शेतकरी केंद्रबिंदू मानून बाजार समितीची उत्तरोत्तर प्रगती करण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले. विविध सहकारी संस्थांमध्ये त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल या प्रतिष्ठानने घेऊन त्यांना सहकार प्रशासकीय सेवा पुरस्कार देऊन गौरविले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.