पुणे महापालिकेतील तिसऱ्या अतिरिक्त आयुक्तपदाची जबाबदारी सुरेश जगतापांकडे

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 27 October 2020

महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांतून तिसरे अतिरिक्त आयुक्त नेमण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने अखेर मंगळवारी मंजूर केला असून, महापालिकेतील सहआयुक्त सुरेश जगताप यांना पदोन्नती देत,अतिरिक्त आयुक्त केले आहे. त्याबाबतचा आदेशही राज्य सरकारने काढला आहे. जगताप यांच्या नेमणुकीने पहिल्यांदाच "आयएएस'ऐवजी महापालिकेतील अधिकाऱ्याकडे हे पद आले आहे. 

पुणे - महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांतून तिसरे अतिरिक्त आयुक्त नेमण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने अखेर मंगळवारी मंजूर केला असून, महापालिकेतील सहआयुक्त सुरेश जगताप यांना पदोन्नती देत,अतिरिक्त आयुक्त केले आहे. त्याबाबतचा आदेशही राज्य सरकारने काढला आहे. जगताप यांच्या नेमणुकीने पहिल्यांदाच "आयएएस'ऐवजी महापालिकेतील अधिकाऱ्याकडे हे पद आले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्याचवेळी महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त शांतनू गोयल यांची बदली झाली असून,त्यांच्याच जागी जगताप यांची नेमणूक करण्यात आली आहे. ते बुधवारी (ता. 28) आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारणार असल्याचे सांगण्यात आले. 

केंद्र सरकारचे धोरण शेतकरी हिताचे नाही : शरद पवार

राज्यातील महापालिकांची वर्गवारी करीत, त्यातील अतिरिक्त आयुक्तांची पदे निश्‍चित करण्यात आली आहेत. पुणे महापालिका "अ'वर्गात असल्याने तीन अतिरिक्त आयुक्तपदे आहेत. त्यानुसार पहिले दोन आयुक्त हे राज्य सरकारने तर तिसरे आयुक्त हे सहआयुक्तांमधून निवडण्याची मागणी महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या संघटनेने लावून धरली होती. त्यानंतर महापालिकेतील अधिकाऱ्याची नेमणूक करण्याचा आदेश राज्य सरकारने 2015 मध्ये काढला होता. सरकारच्या निकषानुसार महापालिकेतील शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्यासह सहआयुक्त ज्ञानेश्‍वर मोळक, विलास कानडे आणि जगताप यांच्या नावांची शिफारस तत्कालीन आयुक्त कुणाल कुमार यांनी सरकारकडे केली होती. मात्र, गेल्या तीन-साडेतीन वर्षांपासून त्यावर कोणताही निर्णय झाला नव्हता. त्याचवेळी राजकीय हस्तक्षेपही झाल्याने हा प्रस्ताव रखडल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, गोयल यांची बदली झाल्यानंतर अतिरिक्त आयुक्त म्हणून जगताप यांची नेमणूक करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. 

कनेक्‍टिंग विमानांची गैरसोय झाल्यास प्रवासाचा वेळ वाढणार

महापालिकेत जगताप हे पहिल्यांदा कनिष्ठ अभियंता म्हणून रुजू झाले होते. त्यानंतर क्षेत्रीय अधिकारी, खातेप्रमुख, उपायुक्त आणि त्यानंतर त्यांना सहआयुक्त पदावर पदोन्नती देण्यात आली होती.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suresh Jagtap is the third Additional Commissioner of Pune Municipal Corporation

Tags
टॉपिकस
Topic Tags: