Pune News : डोळे येण्याच्या रुग्णांमध्ये वाढ; काळजी घेण्याचे नेत्ररोगतज्ज्ञांचे आवाहन

बदलत्या हवामानामुळे आणि हवेतील वाढलेल्या आर्द्रतेमुळे शहरात डोळे येण्याच्या (कंजक्टिवायटिस) साथीने वेग धरला आहे.
Surge in Conjunctivitis Cases

Surge in Conjunctivitis Cases

sakal

Updated on: 

- प्रज्वल रामटेके

पुणे - बदलत्या हवामानामुळे आणि हवेतील वाढलेल्या आर्द्रतेमुळे शहरात डोळे येण्याच्या (कंजक्टिवायटिस) साथीने वेग धरला आहे. डोळे लाल होणे, खाज सुटणे आणि डोळ्यांतून सतत पाणी येणे अशा तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. रुग्णालयातील १० पैकी सुमारे ४ ते ५ रुग्ण हे डोळे येण्याच्या तक्रारीचे आहेत. त्यामुळे संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी वैयक्तिक स्वच्छता राखावी, डोळ्यांना वारंवार हात लावू नये आणि स्वतःच्या मनाने कोणतेही औषधोपचार न करता तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन नेत्ररोगतज्ज्ञांनी केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com