Manish Honwad
sakal
- प्रज्वल रामटेके
पुणे - पुण्यातील ‘सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालया’च्या (एएफएमसी) संचालक आणि कमांडंटपदी सर्जन व्हाइस ॲडमिरल मनीष होनवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते १ सप्टेंबर रोजी या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. ३७ वर्षांहून अधिक काळाच्या सेवेत त्यांनी वैद्यकीय, शैक्षणिक आणि प्रशासकीय क्षेत्रात विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.