esakal | अहो आश्चर्यम्, बारामतीतील कालचा पॉझिटीव्ह रुग्ण आज निगेटीव्ह 
sakal

बोलून बातमी शोधा

plasma-therapy

बारामती शहरातील दूध संघ वसाहतीतील पॉझिटीव्ह असलेल्या रुग्णाची आजची दुसऱ्यांदा केलेली चाचणी निगेटीव्ह आली आहे.  

अहो आश्चर्यम्, बारामतीतील कालचा पॉझिटीव्ह रुग्ण आज निगेटीव्ह 

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे) : बारामती शहरातील दूध संघ वसाहतीतील पॉझिटीव्ह असलेल्या रुग्णाची आजची दुसऱ्यांदा केलेली चाचणी निगेटीव्ह आली आहे.  

 बारावीचा अभ्यासक्रम बदललाय; असे झाले बदल...    

बारामती शहरातील एका 29 वर्षीय युवकाची काल कोरोनाची तपासणी पॉझिटीव्ह आली होती. आज शासकीय प्रयोगशाळेत केलेली तपासणी मात्र निगेटिव्ह आली आहे. शनिवारी संबंधित युवकाने एका खासगी प्रयोगशाळेत तपासणी केली होती. त्याचा अहवाल मंगळवारी आला होता. शनिवारी तपासणी केलेली असल्याने व रविवारी व सोमवारी सुटी असल्याने मंगळवारी त्याचा अहवाल आला. आज पुन्हा संबंधित रुग्णाची तपासणी केल्यानंतर त्याचा अहवाल निगेटीव्ह आल्याने प्रशासनही बुचकळ्यात पडले आहे.

पुणे महापालिकेतील पदाधिकारी महिलेचा कोरोना रिपोर्ट समोर; रिपोर्टमध्ये...

या रिपोर्टमुळे बारामती कोरोनामुक्त असल्याच्या मुद्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. बारामतीत 14 एप्रिल रोजी शेवटचा रुग्ण सापडला होता. बारामती पॅटर्नच्या यशस्वितेमुळे बारामतीत गेल्या काही दिवसात एकही रुग्ण सापडला नव्हता. मात्र, काल दूध संघ वसाहतीत रुग्ण सापडल्याने बारामतीत खळबळ माजली होती.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

खासगी प्रयोगशाळा व सरकारी प्रयोगशाळेतील अहवालात असलेला हा फरक म्हणायचा की इतर काही याबाबत आता चर्चा सुरु झाली आहे. बारामतीतील लॉकडाउन प्रशासनाने उठवले आहे, व्यवस्थित काळजी घेऊनच बारामतीकरांचे कामकाज होत आहे.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

या युवकासोबत इतर 15 जणांचे अहवाल निगेटिव्ह असताना एकाचाच अहवाल काल पॉझिटीव्ह आल्याने सर्वांनाच शंका आली होती. आज संबंधित युवकाचाही रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.