स्मशानभूमीला पुराच्या पाण्याचा वेढा...

राजेंद्र लोथे
शनिवार, 14 सप्टेंबर 2019

खेड तालुक्यातील चासकमान धरणाचे पाचही दरवाजे उघडून 10 हजार 915 क्‍युसेकपर्यंत विसर्ग भीमा नदीत केला आहे. त्यामुळे येथील भीमा नदीवरील चास- कडूस मार्गावरील पूल पुन्हा पाण्याखाली गेला असून, या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. तसेच, चास व पंचक्रोशीसाठी नव्याने बांधण्यात येत असलेली स्मशानभूमीही पुराच्या पाण्याने वेढली गेली आहे.

चास (पुणे) : खेड तालुक्यातील चासकमान धरणाचे पाचही दरवाजे उघडून 10 हजार 915 क्‍युसेकपर्यंत विसर्ग भीमा नदीत केला आहे. त्यामुळे येथील भीमा नदीवरील चास- कडूस मार्गावरील पूल पुन्हा पाण्याखाली गेला असून, या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे सुमारे वीस किलोमीटरचा वळसा घालून पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे. या शिवाय चास व पंचक्रोशीसाठी नव्याने बांधण्यात येत असलेली स्मशानभूमीही पुराच्या पाण्याने वेढली गेली आहे.

खेड तालुक्‍याच्या पश्‍चिम पट्ट्यात गेल्या पाच दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे. भीमा नदीवर असणाऱ्या चासकमान धरणाचे पाचही दरवाजे उघडून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. शनिवारी (ता. 14) धरणातून जवळपास 10 हजार 915 क्‍युसेकपर्यंत पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. या पाण्यामुळे भीमा नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे.

चास- कडूस मार्गावरील चास येथे नदीपात्रातील पूल पाण्याखाली गेला असून, या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. या पुलावर सुमारे तीन फूट पाणी आहे. त्यामुळे सुमारे वीस किलोमीटरचा वळसा घालून पर्यायी मार्गाचा वापर करण्यात येत आहे. चास व पंचक्रोशीसाठी बांधण्यात येत असलेली स्मशानभूमीही पुराच्या पाण्याने वेढली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Surrounding the flood waters to the cemetery at Chas- Pune