जानाई-शिरसाई योजनेत पाणी कालव्याऐवजी बंदनलिकेतून होणार वितरण; असे आहेत योजनेचे फायदे

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 13 October 2020

जनाई -शिरसाई योजनेअंतर्गत बंदनलिका (पाईपलाईन) वितरण प्रणाली राबविण्यासाठीचा प्रस्ताव जलसंपदा विभागाकडून सर्व्हेक्षण सुरू करण्यात आले आहे. लवकरच या संदर्भातील प्रकल्प अहवाल तयार करून तो राज्य सरकारकडे सादर करण्यात येणार आहे.

पुणे - जनाई -शिरसाई योजनेअंतर्गत बंदनलिका (पाईपलाईन) वितरण प्रणाली राबविण्यासाठीचा प्रस्ताव जलसंपदा विभागाकडून सर्व्हेक्षण सुरू करण्यात आले आहे. लवकरच या संदर्भातील प्रकल्प अहवाल तयार करून तो राज्य सरकारकडे सादर करण्यात येणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पुणे जिह्यातील बारामती, दौंड आणि पुरंदर तालुक्‍यातील अवर्षण प्रवण क्षेत्रातील शेतजमिनीला पाणी पुरविण्यासाठी जलसंपदा विभागामार्फत जनाई - शिरसाई उपसा सिंचन योजना राबविण्यात आल्या आहेत. या योजना कार्यान्वित झाल्या असून या योजनेसाठी खडकवासला प्रकल्पातून 3.6. टिएमसी पाणी मंजुर करण्यात आले आहे. तथापि पुणे महानगरपालिकेने खडकवासला प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी आरक्षित केल्यामुळे जनाई-शिरसाई योजनेला पूर्ण क्षमतेने पाणी मिळत मिळत नाही. त्यामुळे भागातील लाभधारक शेतकऱ्यांना पाण्याचा पुरवठा पुरेशा प्रमाणात होत नाही. या अनुषंगाने या प्रकल्पांतर्गत कालव्यांच्या माध्यमातून पाण्याचे वितरण करण्याऐवजी बंदनलिका वितरण प्रणाली (पाईपलाईन) राबविल्यास पाण्याचा वहनव्यय कमी होऊन, योग्य दाबाने शेतीला पाणी मिळू शकेल. असे अधिक्षक अभियंता प्रविण कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत नुकत्याच झालेल्या बैठकीत निदर्शनास आणून दिले होते. त्यावर पवार यांनी या संदर्भातील अहवाल सादर करण्याच्या सूचना जलसंपदा विभागाला दिल्या होत्या. 

'मुख्यमंत्र्यांना शेतीतील काही कळत नाही'' : चंद्रकांत पाटील

त्यानुसार जलसंपदा विभागाने या कामाचे सर्व्हेक्षण सुरू केले आहे. प्राथमिक अंदाजानुसार कालव्याऐवजी बंद नलिका वितरण प्रणालीद्वारे पाणी पुरवठा केल्यास प्रकल्पाची सध्याची कार्यक्षमता पन्नास टक्‍क्‍याहून 77 टक्के पर्यंत वाढू शकणार आहे. मात्र यासाठी 450 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. 

अंतिम वर्षाच्या परिक्षेच्या दुसऱ्या दिवशी ऑफलाइन सुरळीत पण, ऑनलाइन अडखळत

 

 योजनेमुळे होणारे फायदे 
-जानाई-शिरसाई कालव्यावरील 28 गावांना फायदा होणार 
-सुमारे 14 हजाराहून अधिक हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली येणार 
-योजनेतंर्गत जानाईचा कालवा बंद करून 75 किलोमीटर लांबीची जलवाहिनी टाकणार 
-तर शिरसाई योजनेचे कालवा बंद करून 56 किलोमीटर लांबीची पाईप लाईन टाकणार 
- योजनेची कार्यक्षमता 50 टक्‍क्‍यांवरून 77 टक्‍क्‍यांपर्यंत वाढणार 

जानाई-शिरसाई उपसा सिंचन योजना असल्यामुळे त्याला दरवर्षी सुमारे दिड कोटी रूपये वीजबिल येते. ते कमी करण्यासाठी त्या ठिकाणी सौरउर्जाचा वापर करण्याचा प्रस्ताव देखील तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी सुमारे साठ कोटी रूपये खर्च अपेक्षित असून सौरउर्जा प्रकल्प राबविल्यानंतर वीज आणि वीजबिलात मोठी बचत होणार असल्याचेही अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Survey Janai Shirsai scheme distribute water through canal instead of canal started