esakal | पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पासाठी चौसष्ट गावांतील जागेची मोजणी
sakal

बोलून बातमी शोधा

Railway

पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पासाठी चौसष्ट गावांतील जागेची मोजणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - राज्य सरकारच्या (State Government) महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या पुणे-नाशिक (Pune Nashik) सेमी हायस्पीड रेल्वे (Semi Highspeed Railway) प्रकल्पासाठीच्या मार्गिका मोजणीचे काम गतीने सुरू झाले आहे. आतापर्यंत १०१ पैकी ६४ गावांतील जागेच्या मोजणीचे काम पूर्ण झाले, तर साडेचार हजार सर्व्हे नंबरपैकी जवळपास एक हजार सर्व्हे नंबरच्या सर्च रिपोर्टचे तर ४५ टक्के जिओ टेक्निकल सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे.

पुणे-नाशिक शहरांसह पुणे, नगर आणि नाशिक या जिल्ह्यांतून सेमी हायस्पीड रेल्वे जाणार आहे. त्यासाठी पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यातील एक हजार ४७० हेक्‍टर जमीन संपादित करणार आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील हवेली, खेड, जुन्नर आणि आंबेगाव या चार तालुक्यां‍तून लोहमार्गासाठी ५७५ हेक्‍टर जमिनीचे संपादन करावे लागणार आहे. भूसंपादनासंदर्भात रेल्वे विभागाने यापूर्वी प्रस्ताव दाखल केले आहेत. त्यावर कार्यवाही सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील ५७५ हेक्‍टर जमिनीसाठी १३०० ते १५०० कोटी रुपयांच्या निधीची आवश्‍यकता आहे. थेट शेतकऱ्यांशी संवाद साधून जमिनीची खरेदी केली जाणार आहे.

हेही वाचा: टेमघर सह चार धरण १०० टक्के भरली

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाच्या कामाचा आढावा नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला. त्या वेळी ६४ गावांतील मोजणी पूर्ण झाल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रेल कार्पोरेशनने बैठकीत दिली.

loading image
go to top