esakal | टेमघर सह चार धरण १०० टक्के भरली
sakal

बोलून बातमी शोधा

dam

टेमघर सह चार धरण १०० टक्के भरली

sakal_logo
By
राजेंद्रकृष्ण कापसे

खडकवासला : खडकवासला धरण साखळीतील टेमघरसह सर्व धरण १०० टक्के भरली आहेत. चार ही एकाच वेळी पहिल्यांदा १०० टक्के झाली आहेत. परिणामी खडकवासला धरणातील विसर्ग रात्री नऊ वाजता सहा हजार ८४८ क्यूसेक करण्यात आला आहे. टेमघर रात्री दहा वाजता १०० टक्के झाले.

धरणांची १००टक्के पातळी कायम ठेवून, पावसाचे येणारे पाणी नदीत सोडून देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानुसार, मुठानदी किनारी राहणाऱ्या नागरिकांनी सतर्कता बाळगण्याच्या सूचना दिल्याची माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अधिकारी विजय पाटील यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा: योगींच्या जाहिरातीत कोलकत्याचा उड्डाणपुल; तृणमूलचा आक्षेप

सोमवार व मंगळवारी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. त्यानुसार चार ही धरण पूर्ण भरली आहेत. त्यामुळे पावसाचा जोर वाढल्यास खडकवासला धरणातून मुठा नदीतील विसर्ग वाढविणार असल्याची माहिती दिलेली आहे. असे ही पाटील यांनी सांगितले.

खडकवासला धरण सकाळी दहा वाजता ९७ टक्के झाल्यावर या धरणातून १० वाजता ८५६ क्यूसेक पाणी मुठा नदीत सोडण्यास सुरवात झाली. त्यानंतर, दुपारी १२ वाजता एक हजार ७१२ क्यूसेक, दुपारी तीन वाजता तीन हजार ४२४ क्यूसेक, श वाजता पाच हजार १३६, नऊ वाजता सहा वाजता ८४८ क्यूसेक केला आहे. संध्याकाळी पाच वाजता खडकवासला येथे ०, वरसगाव ४पानशेत २ व टेमघर २० मिलिमीटर पाऊस झाला आहे.

पानशेत धरण १०० टक्के भरले आहे. या धरणातून वीज निर्मितीसाठी ६०० क्यूसेक तर नदीत ४५१ क्यूसेक पाणी आंबी नदीत सोडले आहे. वरसगाव १००टक्के भरले आहे. वरसगाव धरणातून ४४४० क्यूसेक सोडले होते रविवारी रात्री नऊ विसर्ग एक हजार ७७७ क्यूसेक पर्यत कमी केला आहे. धरणातील पाणी मोसे नदीत सोडले आहे. टेमघर धरण रात्री दहा वाजता १०० टक्के झाले आहे. खडकवासला धरणातून नदीत सोडलेल्या पाण्याच्या व्यतिरिक्त कालव्यातून एक हजार १५५ क्यूसेक पाणी शेतीसाठी सोडले आहे.

loading image
go to top