शेकटकर, आमटेंना सूर्यदत्ता जीवनगौरव पुरस्कार जाहीर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 जानेवारी 2020

पुणे : सूर्यदत्ता एज्युकेशन फाऊंडेशनच्या सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट तर्फे दिला जाणारा 'सूर्यदत्ता जीवनगौरव पुरस्कार' लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. डी. बी. शेकटकर व डॉ. विकास आमटे यांना जाहीर झाला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तसेच विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या लायन द्वारका जालान, टोनींनो लॅम्बोर्गीनी, पद्मश्री सुधा मल्होत्रा, डॉ. मकरंद जावडेकर, डॉ. कमल टावरी आदिंनी या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. अशी माहिती इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

रंगणार कोथरूड सांस्कृतिक महोत्सवाची दशकपूर्ती 

डॉ. चोरडिया म्हणाले, फाऊंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त हे पुरस्कार देण्यात येणार आहे. हा पुरस्कार सोहळा 7 फेब्रुवारीला सायंकाळी पाच वाजता बावधन येथील सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या प्रांगणात होणार आहे. अभिनेता रझा मुराद, पद्मश्री मिलिंद कांबळे, डॉ. भूषण पटवर्धन (विद्यापीठ अनुदान आयोग दिल्ली, उपाध्यक्ष). हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतील व यांचा हस्ते पुरस्कार प्रदान केला जाणार आहे

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suryadatta Lifetime achievement award declare to Left D B Shekatkar and Vikas Amte