
औंध : राज्याच्या विविध भागांतील नागरिक सूस, म्हाळुंगे, हिंजवडी भागात वास्तव्य करण्यासाठी प्राधान्य देत आहेत, परंतु यामुळे वाढत्या रहिवासी संकुलांसोबतच रस्त्यावरील वाहतुकीचा प्रश्नही ऐरणीवर आलेला आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक कोंडीच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी वेगाने पावले उचलली जात असून, लवकरच सूस-म्हाळुंगे रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू होणार आहे.