पुण्याच्या सुशांत जाधवची 'फ्लायिंग ऑफिसर'पदी निवड; संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते सन्मानित

Sushant Jadhav of Pune selected as Flying Officer And Honored by the Minister of Defense
Sushant Jadhav of Pune selected as Flying Officer And Honored by the Minister of Defense

पुणे : हैदराबाद येथील वायू सेना अकादमी येथे 19 डिसेंबरला भारतीय वायू सेनेचा दिक्षान्त सोहळा (पासिंग आउट परेड) पार पडला. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते पुण्याच्या सुशांत जाधव यांना सन्मानित करण्यात आले असून त्यांना फ्लाइंग ऑफिसर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्यांच्या या निवड पुणेकरांसाठी अत्यंत अभिमानाची बाब ठरली आहे.

भाजप आमदाराच्या लग्नाला हजारोंची गर्दी; अन् सर्वसामान्यांना फक्त 50 जणांची मर्यादा​

सुशांत धनराज जाधव याने भारतीय वायू सेनेची निवड प्रक्रिया पहिल्याच प्रयत्नात पार कर वयाच्या 21 व्या वर्षी हैदराबाद येथील वायू सेना अकादमी येथे प्रशिक्षणासाठी प्रवेश मिळविला. जानेवारी 2020 ते डिसेंबर 2020 दरम्यान एक वर्षाचे खडतर प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर वयाच्या 22 वर्षी त्यांची नियुक्ती बरेली येथील वायू सेनेच्या तळावर झाली आहे. सुशांत याने पुणेकरांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्याबद्दल पुण्यातील विविध स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनो, निवडणुका ताकतीने लढवण्याची तयारी करा : वळसे-पाटील​

सुशांत यांचे शालेय शिक्षण आंबेगाव येथील सिंहगड स्प्रिंग डेल विद्यालय येथून आणि महाविद्यालयीन शिक्षण वाणिज्य शाखेतून सिम्बॉयसिस कॉलेज येथून पूर्ण झाले आहे. तसेच, त्यांचे एनसीसीचे प्रशिक्षण देखील पूर्ण झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com