...म्हणून भाजपमध्ये इनकमिंग : सुषमा अंधारेंचा आरोप

sushma-andhare.jpg
sushma-andhare.jpg

पुणे : एकेकाळी भाजपवर विखारी टीका करणारे नेते आता भाजप नेत्यांना मिठ्या मारत आहेत. विरोधक संपवून लोकशाही खिळखिळी करण्याचा भाजपचा डाव आहे. त्यासाठीच पक्षात मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू केले आहे, अशी टीका सामाजिक कार्यकर्त्या, गणराज्य संघाच्या अध्यक्षा सुषमा अंधारे यांनी केली. 

भीम आर्मीतर्फे (बहुजन एकता मिशन, महाराष्ट्र) गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित 'संविधानविरोधी सरकार... चले जाव महापरिषदेत' अंधारे बोलत होत्या. ज्येष्ठ विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी, दिल्ली येथील मुस्लिम विचारवंत वली रेहमानी, आंबेडकरी विचारवंत कुमार मेटांगे, संयोजक भीम आर्मीचे प्रदेशाध्यक्ष दत्ता पोळ, महिला आघाडीच्या नीता आडसुळे, उपाध्यक्ष हुसेनभाई शेख, मुकेश गायकवाड, संपर्कप्रमुख प्रदीप कांबळे आदी या वेळी उपस्थित होते. 

अंधारे म्हणाल्या, "भारतीय म्हणून आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. समानतेच्या पातळीवर आणणारी आंबेडकरी चळवळ बळकट व्हावी. आज मोदी-शहांची जोडगोळी आणि फडणवीस सरकार जनतेची फसवणूक करीत आहे. बॅलेट पेपर दूर करून ईव्हीएमच्या घोळात निवडणुका होत आहेत. ईव्हीएमविरोधी मोहिमेत सगळे एकत्र आले पाहिजेत.'' 

डॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले, "लोकशाहीमध्ये जात, धर्म आणता कामा नये. लोकशाहीविरोधी हिंदुत्ववाद्यांचा डाव उधळून लावण्यासाठी आपण एकत्र आले पाहिजे.'' 

वली रेहमानी म्हणाले, "संविधान नसते तर आपण आजच्यासारखे जगू शकलो नसतो. संविधान बदलू पाहणारे टोकाचे पाऊल उचलू शकतात.'' 

कुमार मेटांगे म्हणाले, "सरकार टप्प्याटप्प्याने संविधान कमकुवत करत असून, हा डाव आपल्याला हाणून पाडण्यासाठी आपण जागृत राहिले पाहिजे.'' 

दत्ता पोळ यांनी प्रास्ताविक केले. दीपक म्हस्के यांनी सूत्रसंचालन केले. जैलाबभाई शेख यांनी आभार मानले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com