पुण्यात नाना पेठेत फ्लॅटमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; पोलिस तपास सुरू 

टीम ई-सकाळ
Friday, 13 March 2020

शर्मा कुटुंबीय मूळचे राजस्थान येथील आहे. ते नाना पेठेतील पिंपरी चौकातील एका सोसायटीमधील फ्लॅटमध्ये राहतात.

पुणे : शहराच्या मध्यवस्तीमधील एका सोसायटीतील सदनिकेमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला. महिलेने आत्महत्या केल्याचे किंवा तिचा खून झाला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ही घटना नाना पेठेमध्ये शुक्रवारी रात्री उघडकीस आली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

राधा राधेश्याेम शर्मा (वय 30, रा. नाना पेठ) असे मृतावस्थेत सापडलेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शर्मा कुटुंबीय मूळचे राजस्थान येथील आहे. ते नाना पेठेतील पिंपरी चौकातील एका सोसायटीमधील सदनिकेमध्ये राहतात. राधेश्याूम शर्मा यांचा केटरिंगचा व्यवसाय आहे. ते त्यांच्या कामानिमित्त कोल्हापूरला गेले होते. शुक्रवारी सकाळपासून ते पत्नीच्या मोबाइलवर संपर्क साधत होते. मात्र त्यांना पत्नीकडून प्रतिसाद मिळत नव्हता. त्यानंतर शुक्रवारी रात्री आठता ते त्यांच्या घरी आले. त्यावेळी घराचा दरवाजा बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी या घटनेची माहिती समर्थ पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पोलिसांनी शर्मा यांच्या घराचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. तेव्हा राधा मृतावस्थेत आढळून आल्या. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविला. शवविच्छेदन अहवाल मिळाल्यानंतर महिलेच्या मृत्युचे कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान, राधा यांनी आत्महत्या केली किंवा त्यांचा खून झाला, याबाबत पोलिसांकडून तपास केला जात आहे. रात्री उशीरापर्यंत या प्रकरणात चौकशीसुरू होती. दरम्यान, परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी घटनास्थळी भेट दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: suspected dead body found in flat nana peth pune