esakal | पुणे : साध्वी प्रज्ञासिंह यांना संशयास्पद पत्र; पंतप्रधान मोदी, योगी आदित्यनाथ यांच्या फोटोंवर फुली
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे : साध्वी प्रज्ञासिंह यांना संशयास्पद पत्र; पंतप्रधान मोदी, योगी आदित्यनाथ यांच्या फोटोंवर फुली

- साध्वी प्रज्ञा सिंह यांना संशयास्पद पत्र

- पांढऱ्या रंगाच्या पावडरची पाकीटे 

पुणे : साध्वी प्रज्ञासिंह यांना संशयास्पद पत्र; पंतप्रधान मोदी, योगी आदित्यनाथ यांच्या फोटोंवर फुली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या भोपाळ येथील घरी आलेले संशयास्पद पत्र व त्यासोबत पांढऱ्या पावडरच्या दोन पाकिटे पुण्यातून पाठविल्याची माहिती पुढे आली आहे. संबंधित पत्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या छायाचित्रावर फुली मारून बंदूक रोखल्याचा उल्लेख आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

स्वामी रामचंद्र अय्यर ईश्वरचंद असे पत्र पाठविणाऱ्याचे नाव असून, त्यावर शिवाजी चौक, खडकी बाजार, खडकी, पुणे असा उल्लेख आहे. पत्रासोबतच्या दोन पाकिटामध्ये पांढऱ्या रंगाची पावडर आहे. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर भोपाळ पोलिसांनी साध्वी ठाकूर यांच्या घरी धाव घेतली. या पत्रामध्ये पंतप्रधान मोदी, आदित्यनाथ व डोवाल यांच्या छायाचित्रावर लाल रंगाने फुली मारण्यात आली आहे. तिघांच्याही छायाचित्रासमोर बंदूक रोखण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, संबंधित संशयास्पद पत्र किंवा त्याच्या तपासाबाबत पुणे पोलिसांना अद्याप कोणतीही विचारणा झाली नसल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, ऊर्दु भाषेमध्ये लिहिलेले संबंधित पत्र ऑक्‍टोबरमध्ये पाठविण्यात आले होते. ते पत्र ठाकूर यांनी सोमवारी रात्री साडेनऊ वाजता उघडून पाहिले. पत्र उघडल्यानंतर त्यामध्ये दोन पाकिटे आढळली. त्यात पांढऱ्या रंगाची पावडर आहे. त्यास हात लावल्याने त्यांच्या हाताच्या त्वचेला जंतुसंसर्ग झाल्याचे साध्वी यांनी भोपाळ पोलिसांना सांगितले. 

loading image