Daund Crime : विवाहितेचा संशयास्पद मृत्यू, तीन तास पोलिस ठाण्यात ठेवला मृतदेह

विवाहितेच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी सासरच्या लोकांना अटक करण्याच्या मागणीसाठी संतप्त कुटुंबीयांनी दौंड पोलिस ठाण्यात मृतदेह आणून ठेवला.
Daund Crime
Daund CrimeSakal

दौंड - विवाहितेच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी सासरच्या लोकांना अटक करण्याच्या मागणीसाठी संतप्त कुटुंबीयांनी दौंड पोलिस ठाण्यात मृतदेह आणून ठेवला आहे. विवाहितेचा पती हा पुणे शहर पोलिस दलात अंमलदार आहे. दौंड पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास विलंब होत असल्याने नातेवाईक संतप्त झाले आहेत.

श्वेता रोहित ओहोळ (वय-२३, रा. रेल्वे हायस्कूल रस्ता, बंगला साइड, दौंड) ही विवाहिता बुधवारी (ता. २०) रात्री गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. श्वेता हिला उपचारांसाठी एका खासगी रूग्णालयात दाखल केले असता डॅाक्टरांनी ती उपचारापूर्वीच मयत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर तिचा शव विच्छेदनासाठी सुरवातीला दौंड उप जिल्हा रूग्णालयात व नंतर पुणे येथील ससून सर्वोपचार रूग्णालयात नेण्यात आला.

याबाबत श्वेता हिचे काका शाम नागराज जाधव (रा. गोवा गल्ली, दौंड) यांनी दिलेल्या माहितीनुसार दौंड पोलिस ठाण्यात फौजदारी प्रक्रिया संहिता मधील कलम १७४ अन्वये अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली.

दरम्यान आज (ता. २१) दुपारी श्वेता हिच्या माहेरच्या लोकांनी श्वेता हिची सासरच्या मंडळींनी हत्या केल्याचा दावा करीत दौंड पोलिस ठाण्यात मृतदेहासह ठाण मांडले. श्वेता हिचा मृतदेह पोलिस ठाण्यातील ध्वजस्तंभाजवळ ठेवून नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला.

संतप्त जमाव कारवाईसाठी आग्रही असताना पोलिसांनी श्वेता हिचे कुटुंबीय व समाजबांधवांशी संवाद न साधल्याने नातेवाईक संतप्त झाले आहेत.

रात्री पावणेआठ वाजेपर्यंत मृतदेह पोलिस ठाण्यात होता. या बाबत दौंड पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली. श्वेता हिने चार वर्षापूर्वी रोहित याच्याबरोबर आंतरजातीय विवाह केला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com