

FDA
ESakal
पुणे - मुदतबाह्य आणि खराब अन्नपदार्थांची अधिकृत विल्हेवाट लावण्याऐवजी ते हेराफेरी करत पुन्हा बाजारात विक्रीसाठी आणले जात असल्याच्या संशयावरून अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) जिल्ह्यातील अन्नपदार्थ साठवणूक करणाऱ्या दोन गोदामांवर कारवाई केली आहे. खेड तालुक्यातील चाकण येथील रिलायन्स रिटेल लिमिटेड आणि खेड तालुक्यातील निघोजे येथील ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांचे अन्न सुरक्षा परवाने निलंबित करण्यात आले.