

Intensive Voter Awareness Campaign Under SVEEP in Hadapsar
Sakal
हडपसर : मतदार शिक्षण आणि निवडणूक सहभाग (स्विप) कार्यक्रमांतर्गत निवडणूक आयोगाकडून परिसरात ठिकठिकाणी मतदार जागृती केली जात आहे. सार्वजनिक स्थापने शाळा महाविद्यालय चौक आदी ठिकाणी निवडणूक कर्मचाऱ्यांच्या वतीने मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी गणेश मरकड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहाय्यक निवडणूक अधिकारी रवि खंदारे, अविनाश पिसाळ व सुनील पाटील यांच्या नियोजनानुसार ही जागृती होत आहे.