पुणे : नवले हॉस्पिटलमध्ये कोरोनाच्या तपासणीसाठी जायचंय? तर हे वाचा!

Navale Hospital_Pune
Navale Hospital_Pune
Updated on

किरकटवाडी : जिल्हा परिषदेकडून बिल न मिळाल्यामुळे नवले हॉस्पिटलने मागील दोन दिवसांपासून नवीन संशयित रुग्णांचे स्वॅब घेणे बंद केले आहे. परिणाणी पश्चिम हवेलीतील रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. कोरोना तपासणी करून घेण्यासाठी पश्चिम हवेलीतील रुग्णांना थेट पूर्व हवेलीतील तपासणी केंद्रांमध्ये जाऊन स्वॅब देण्यासाठी दिवसभर थांबून राहावे लागत आहे.

हवेली तालुक्यातील रुग्णसंख्या सध्या मोठ्या वेगाने वाढत आहे. पश्चिम हवेलीतील नऱ्हे, नांदेड, किरकटवाडी खडकवासला, खानापूर या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. प्रकृती खालावलेल्या रुग्णांना अतिदक्षता विभागात जागा उपलब्ध नसल्याने परिस्थिती अधिकच चिंताजनक बनली आहे. त्यातच आता नवले हॉस्पिटलने नवीन तपासणी करणे बंद केल्यामुळे नागरिकांच्या अडचणीत अधिकच भर पडली आहे. रुग्णांना घेऊन जाण्यासाठी ॲम्बुलन्स येण्यासाठी दोन ते तीन तासांचा कालावधी लागतो व पुन्हा पूर्व हवेलीतील तपासणी केंद्रावर जाऊन तिथेही दिवस-दिवसभर थांबून राहावे लागत असल्याने रुग्णांच्या संपर्कात आलेल्या संशयितांची तपासणी करताना हेळसांड होताना दिसत आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जिल्हा परिषदेकडून हॉस्पिटलचे बिल न मिळाल्याने तपासणी केंद्र बंद केल्याची माहिती मिळत आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर भगवान पवार यांच्याशी याबाबत संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु त्यांनी उत्तर दिले नाही. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी या समस्येबाबत गांभीर्याने दखल घेऊन नवले रुग्णालयाशी चर्चा करणे आवश्यक आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता,"महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून सध्या सर्व कोरोना रुग्णांवर करण्यात येत असलेल्या उपचारांचा खर्च दिला जात आहे. पंधरा दिवसांच्या टप्प्याने संबंधित हॉस्पिटलचे बिल अदा केले जाते. जिल्हा परिषदेकडून कोणतेही बिल थकवले गेले नाही. नवले हॉस्पिटलमध्ये ज्या रुग्णांना जास्त लक्षणे आहेत, अशाच रुग्णांना ऍडमिट करायचे आहे. त्यामुळे इतर ठिकाणी तपासणी करून ज्या रुग्णांना तातडीने उपचारांची गरज आहे. त्यांनाच नवले रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दोन दिवसांपूर्वी सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. तेथेही सुमारे सहाशे रुग्णांची व्यवस्था होईल, असे नियोजन करण्यात आले आहे. रुग्णांची गैरसोय होऊ दिली जाणार नाही. हवेली तालुक्यामधील 10 गावांमध्ये स्वॅब कलेक्शन सेंटर सुरू करण्याचे नियोजन असून पुढील दोन दिवसांमध्ये त्याबाबत कार्यवाही होईल, अशी माहिती त्यांच्याकडून देण्यात आली.

(Edited By : Krupadan Awale)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com