'ही' संघटना तरुणांसाठी फर्ग्युसन रस्त्यावर काढणार प्रेमयात्रा...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 जानेवारी 2020

तरुणाईने फुललेल्या बहरलेल्या फर्ग्युसन रस्त्यावर 'परेड ऑफ लव्ह' म्हणजे प्रेम यात्रा काढणार आहेत. 

पुणे : राजकीय पेचप्रसंग अनुभवलेला 'व्हॅलेन्टाईन डे' अधिक गोडी गुलाबीने साजरा व्हावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुढाकार घेतला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यासाठी तरुणाईने फुललेल्या बहरलेल्या फर्ग्युसन रस्त्यावर 'परेड ऑफ लव्ह' म्हणजे प्रेम यात्रा काढणार आहेत. संघटनेच्या वतीने  व्हॅलेन्टाईन दिनानिमित्त शुक्रवारी (ता. १४) प्रेमयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही प्रेम यात्रा शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता फर्ग्युसन रस्त्यापासून ते कृषी महाविद्यालयापर्यंत होणार आहे. अशी माहिती संघटनेचे आयोजक राहुल म्हस्के यांनी पत्रकार परिषदेत दिली.

भाजप खासदाराचा घरचा आहेर; 'एअर इंडिया विकणे म्हणजे देशद्रोह'

म्हस्के म्हणाले, ''व्हॅलेंटाईन डे हा जगभरात साजरा केला जातो. यामुळे शेतकऱ्यांच्या फुलांना निर्यातक्षम बाजारपेठ प्राप्त होतात. तसेच नागरिकांनी हा दिवस मोठ्या संख्येत साजरा केला तर शेतकऱ्यांच्या फुलांची स्थानिक मागणी सुद्धा वाढेल.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SwabhiShetkari sanghatna taking thoughtful initiative on valentines day