
Swachh Bharat Abhiyan : कात्रज तलाव झाला चकाचक!
कात्रज : कात्रज येथील नानासाहेब पेशवे तलाव स्वच्छ जल, स्वच्छ मन अभियानांतर्गत संत निरंकारी मिशनच्या वतीने आरोग्य विभाग यांच्या सहकार्यातुन स्वच्छता मोहिमेने ३ टन कचरा मुक्त संकलित करत परिसर स्वच्छ करण्यात आला.
सदर स्वच्छता मोहिमेत संत निरंकारी मिशनचे झोनल प्रमुख ताराचंद करमचंदनी, आनंद दळवी, रमेश जगताप, लंकेश हंडे, सुनिल खेडेकर आदींसह ३२५ सेवक सहभागी झाले होते. कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त डॉ.ज्योती धोत्रे,
वरिष्ठ आरोग्य निरीक्षक मंगलदास माने, आरोग्य निरीक्षक प्रशांत कर्णे, अभिजीत सुर्यवंशी, सचिन बिबवे, उमेश ठोंबरे, अमर शेरे यांनी कर्मचारी व वाहने यांच्या साहाय्याने ३ टन कचऱ्याचे संकलन करत संपूर्ण परिसर स्वच्छ केला.
सदर अभियानसाठी लागणारे साहित्य पेशवे तलाव हजेरी कोठीकडून व लागणारी वाहने वाहन डेपोकडून ट्रँक्टर, टिप्पर, छोटा हत्ती, जेसीबी पुरविण्यात आले होते. यावेळी माजी नगरसेवक प्रकाश कदम, युवराज बेलदरे यांनी स्वच्छता मोहीमेला भेट देत संत निरंकारी मिशन भक्त सेवकांचे व आरोग्य विभागाच्या उपक्रमाचे कौतुक करत नागरिकांनी तलाव परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले.