
पुणे : ‘‘ज्याप्रमाणे गंगा शुद्ध असली तरी त्यातील नाल्यांमुळे ती प्रदूषित होते; तसेच संघाच्या कार्याची व्याप्ती वाढल्याने आयात झालेल्या लोकांमुळे संघ प्रदूषित होण्याची भीती वाटते’’, असे मत अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी व्यक्त केले. ‘मृत्युंजय भारतासाठी हिंदुत्व प्रभावी हवे’, असेही ते म्हणाले.