पुणे विद्यापीठात स्वामी विवेकानंद आणि खाशाबा जाधव यांचा पुतळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Swami vevekandnd and Khashaba Jadhav

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ऑलिंपिक पदक विजेते कुस्तीगीर खाशाबा जाधव आणि स्वामी विवेकानंद यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे.

पुणे विद्यापीठात स्वामी विवेकानंद आणि खाशाबा जाधव यांचा पुतळा

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Pune University) ऑलिंपिक पदक विजेते कुस्तीगीर खाशाबा जाधव (Khashaba Jadhav) आणि स्वामी विवेकानंद यांचा पूर्णाकृती पुतळा (Statue) उभारण्यात येणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत नियोजित पुतळ्याला आता मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी ट्वीटरद्वारे दिली.

विद्यापीठात उभारण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिडा संकुलाला खाशाबा जाधव यांचे नाव देण्यात आले आहे. आता संकुलाच्या प्रवेशद्वारावरच त्यांच्यासह विवेकानंदांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे आणि विविध आंतरराष्ट्रीय स्तरांवरील क्रीडा प्रकारांचा सराव करता यावा म्हणून २७ एकराचे क्रिडा संकुल उभारण्यात आले आहे. रनिंग ट्रॅक, अथॅलिटीक्स, खोखो, शूटिंग रेंज, बॅडमिंटन आदी १०० प्रकारचे खेळ या ठिकाणी खेळले जाणार आहे. व्यवस्थापन परिषदेच्या एका बैठकीत सदस्य राजेश पांडे यांनी खाशाबांच्या नावाचा प्रस्ताव मांडला होता.

विद्यापीठातील सध्याचे पूर्णाकृती पुतळे -

- छत्रपती श्री शिवाजी महाराज

- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

- सावित्रीबाई फुले

- महात्मा जोतिबा फुले

- राजश्री शाहु महाराज

ट्वीटरवर ऑनलाइन परीक्षेची मागणी -

मंत्री सामंत यांच्या ट्वीटला प्रतिक्रिया देताना विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षेची मागणी केली आहे. अमोल बोरुडे म्हणतात, ‘आम्हाला जर ऑनलाइन शिकविले असेल, तर परीक्षाही ऑनलाइन घ्यावी. राज्यातील सर्वच विद्यापीठांची उन्हाळी परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात यावी.’ मुंबई विद्यापीठाच्या काही विद्यार्थ्यांनी ८० गुणांच्या प्रश्नपत्रिकेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. मुंबई विद्यापीठ मे महिन्यातच परीक्षा घेत असून, अधिकचे १५ मिनीटे आणि प्रश्नसंचाची सुविधाही देत नाही, असे पंकज वासकर यांनी म्हटले आहे.

Web Title: Swami Vivekanand And Khashaba Jadhav Statue In Pune University

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top