या परिस्थितीतून आपण नक्की बाहेर पडू - स्वप्नील जोशी

या परिस्थितीतून आपण नक्की बाहेर पडू - स्वप्नील जोशी
Updated on

आत्ता जगावरच खूप मोठं संकट आहे, परिस्थिती भयावह आहे. हे जरी खरं असलं तरी आपला इतिहास असं सांगतो की जेव्हा-जेव्हा अशी भयावह परिस्थिती आली, तेव्हा माणसाने त्यावर मात केली आहे. मी तर फार सकारात्मक व्यक्ती आहे. त्यामुळे या परिस्थितीतून आपण नक्की बाहेर पडू, याची खात्री आहे. मी या लॉकडाऊनकडेही सकारात्मकदृष्ट्या बघतोय. प्रदूषणाची पातळी खूप कमी झाली आहे. मी कित्येक वर्ष मुंबईत राहतोय, पण इतकी स्वच्छ हवा मी आजपर्यंत मुंबईत कधी अनुभवली नव्हती. मुंबईच्या रस्त्यावर मोर दिसताहेत यापेक्षा सुंदर काय असू शकतं ! 

या लॉकडाऊनच्या काळात मी तरी जात-धर्म वगैरे फार कधी ऐकलं नाहीये. मी ऐकतोय आणि पाहतोय ते म्हणजे, लोकं एकमेकांना सढळ हाताने मदत करताहेत. राजकीय पक्षांचे नेते एकमेकांवर चिखलफेक करत नाहीयेत. माणसं एकमेकांशी प्रेमाने वागताहेत. अर्थात यासर्वांत काही अपवाद आहेत. पण, सकारात्मकता मात्र नक्की वाढली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याकाळात माणूस फार संवेदनशील होतोय, माणूस माणसाला आदर द्यायला शिकतोय. सफाई कर्मचारी या आधीही स्वच्छतेचे काम करतच होते, डॉक्‍टर्स व नर्सही वैद्यकीय सेवेचे काम करत होते. पण, आपण त्यांना गृहीत धरायचो. याकाळात मात्र आपल्याला त्यांच आणि त्यांच्या कामाच महत्त्व समजू लागलं आहे. लॉकडाऊनमध्ये अशी अनेक लोकं आहेत, जी आता हिरो म्हणून आपल्या समोर आली आहेत. आपण ज्या-ज्या गोष्टी गृहीत धरत होतो, त्याची किंमत आपल्याला नव्याने समजायला लागली आहे आणि ही किंमत आपल्याला समजल्याने यापुढे आपण यासर्व गोष्टींचा वापर जबाबदारीने करू. 

आपल्या सर्वांना परिवारासाठी वेळ मिळालाय. आपल्या कुटुंबासाठी अनेकजण धावत होते. प्रचंड मेहनत करत होते. पण, त्या कुटुंबासाठी त्यांना वेळ मात्र देता येत नव्हता. अशांना आता तो वेळ मिळतोय. प्रत्येकाला आपण इतके धावतोय ते खरच योग्य आहे का?, याचे अवलोकन करायची संधी मिळाली आहे. 

इंग्रजीत एक छान म्हण आहे "लीडर्स आर ऑलवेज बोर्न इन क्रायसेस' संकट तर आलंय; पण त्यातून "लीडर' म्हणून बाहेर पडायचं की नाही हे ज्याचं त्याने ठरवायचं. संधी तर सर्वांना आहेच. 

मी तरी हा वेळ खूप सत्कारणी घालवतोय. सध्या वेबसाईटचं काम करत होतो. नुकतीच ती सुरू केली. फॅन्सशी सोशल मिडीयावर बोलतोय. काही नवीन स्क्रिप्टचं वाचन सुरू आहे आणि मुख्य म्हणजे घरातली कामं करतोय. उरलेला वेळ माझ्या मुलांबरोबर घालवतोय. त्यांच्याकडून नव्याने हसायला शिकतोय. एक यु ट्यूब चॅनेल सुरू केलाय. पिलू टीव्ही नावाने. त्यावर मोठ्यांसाठी कार्यक्रम आहेत, छोट्यांसाठी गोष्टी आहेत, खाद्यपदार्थ आहेत, आजीबाईचा बटवा आहे, तो चॅनेलपण नक्की बघावा आणि आनंद घ्यावा. 

मला आवर्जून एक गोष्ट सांगावीशी वाटते आहे की हीच वेळ आहे दुसऱ्याला मदत करायची. ती किती रुपयांची किंवा वस्तूंची करतोय हे नगण्य आहे. मदत करण्याची भावना फार महत्त्वाची आहे. 

आपण जेव्हा मागे वळून या दिवसांकडे बघू तेव्हा आपल्याला हे नक्की जाणवेल की निसर्गाने आणि नियतीने आपल्याला स्वतःसाठी वेळ दिला होता. या दिलेल्या वेळेचं आपण काय करायचं हे ज्याच त्याने ठरवायचं. 

(शब्दांकन ः अंकित काणे) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com