esakal | ''मला माफ करा, १०० जीव वाचवायचे होते; पण...'' स्वप्निलचे स्वप्न अधुरे !
sakal

बोलून बातमी शोधा

''मला माफ करा, १०० जीव वाचवायचे होते; पण...''

''मला माफ करा, १०० जीव वाचवायचे होते; पण...''

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘‘मला माफ करा, १०० जीव वाचवायचे होते; पण प्लेटलेट डोनेशन करून ७२ राहीले’, अशी वळणदार व तितक्‍याच सुंदर अक्षरात स्वप्निल लोणकर या विद्यार्थ्याने मृत्युपूर्व चिठ्ठी लिहिली. एक-दोनदा नव्हे, तर तब्बल २८ वेळा दुर्धर आजाराने ग्रस्त रुग्णांना वाचविण्यासाठी स्वप्निलने प्लेटलेट दान करण्याचे काम केले, मात्र १०० जणांसाठी काम करण्याची त्याची इच्छा अपुरीच राहीली !

‘एमपीएसीसी’ची परिक्षा देऊनही हातात नोकरी नाही, आर्थिक परिस्थिती नाजूक असतानाही आपण कुटुंबीयांना मदत करू शकत नसल्यामुळे स्वप्निलने बुधवारी त्याच्या राहत्या घरात आत्महत्या केली. त्यापूर्वी त्याने लिहिलेल्या चिठ्ठीत भावनांना वाट मोकळी करून दिली.

हेही वाचा: पानशेत धरणात घेणार सामुहिक जलसमाधी; वांजळवाडी ग्रामस्थ संतप्त

हेही वाचा: पुण्यात नाटक करणाऱ्या राजकुमारचा काळ रशियातल्या चित्रपटगृहात

‘‘येणाऱ्या प्रत्येक दिवसासोबत फक्त वय आणि ओझं वाढत जात आहे. दोन वर्ष झाली पासआऊट होऊन आणि २४ वय संपत आले आहे. घरची एकंदरीत परिस्थिती, परिक्षा निघणार या आशेवर घेतलेले कर्ज, खासगी नोकरी करून कधीही फिटू न शकणारा कर्जाचा डोंगर, घरच्यांच्या आणि इतरांच्या वाढत्या अपेक्षा आणि माझी मी प्रत्येक वेळी, प्रत्येक ठिकाणी कमी पडतोय ही भावना’’, असे मानसिक द्वंद्व स्वप्निलने त्याच्या चिठ्ठीतून मांडले आहे.

नोकरी मिळाल्यावर घरासाठी घेतलेले कर्ज फेडता येईल, असे स्वप्निलला वाटत होते. त्याच्या इच्छेनुसारच मी कर्ज काढून घर बांधले. कर्जाच्या हप्त्याची परतफेड सुरू आहे. असे असताना ‘एमपीएससी’ची दोनदा परिक्षा देऊन, त्यामध्ये उत्तीर्ण होऊनही नोकरी नाही, याचे त्याला दुःख वाटत होते. त्या तणावातूनच त्याने आत्महत्या केली. माझ्या मुलाप्रमाणे इतर कोणी असे करू नये, यासाठी मीच आता लढणार आहे.
- सुनील लोणकर (स्वप्निलचे वडील)

loading image
go to top