esakal | पुण्यात नाटक करणाऱ्या राजकुमारचा काळ रशियातल्या चित्रपटगृहात
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यात नाटक करणाऱ्या राजकुमारचा काळ रशियातल्या चित्रपटगृहात

पुण्यात नाटक करणाऱ्या राजकुमारचा काळ रशियातल्या चित्रपटगृहात

sakal_logo
By
अशोक गव्हाणे

पुणे : पुण्यात नाटक करणाऱ्या राजकुमार जरांगेचा काळ हा चित्रपट रशियातील जवळपास ५० चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. बीड जिल्ह्यातील शिरुर कासार तालुक्यातील युवा कलावंत राजकुमारची भूमिका असलेला काळ हा मराठी चित्रपट रशियात प्रदर्शित झाला असून डी. संदीप यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि नितिन वैद्य, रंजीत ठाकुर आणि हेमंत रूपेरि यांची निर्मिती असलेल्या चित्रपटाचे शुटींग कलाकारांनीच केलेले आहे.

जानेवारी २०२० मध्ये महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेल्या या सिनेमात राजकुमार जरांगे सोबत सतीश गेजगे, संकेत विश्वासराव, श्रेयश बेहरे, वैभवी चव्हाण आणि गायत्री चिघळिकर यांच्याही भूमिका आहेत. राजकुमार जरांगेची निवड सावित्रीबाई फूले विद्यापीठातील घनदाट झाडांमध्ये त्याचं ऑडिशन घेतलं आणि त्यातून त्याची निवड झाली. राजकुमार जरांगे हा औरंगाबादेत अभियांत्रिकीचे शिक्षण घेताना नाट्यक्षेत्राकडे ओढला गेला. पुरषोत्तम करंडक, राज्य नाट्य स्पर्धांत त्याने भाग घेऊन सुरुवातीला नाव केलं. द ट्री स्टोरी, वेत्रवतः, सुपारी, 'गिधाड़े आणि गेल्या वर्षी भावकी या नाटकांतील भुमिकांबद्दल त्याला उत्कृष्ट अभिनेता म्हणुन नामांकन मिळालं. यापूर्वी त्याने घुमा या चित्रपटातही भूमिका साकारली आहे. त्यानंतर, २०१८मध्ये काळ हा सिनेमा मिळाला.

हेही वाचा: लॉकडॉऊनमुळे होम अ‍ॅप्लायन्सेसची मागणी वाढली

राजकुमारचा पुण्यातील प्रवास

२०१६ला अभियांत्रिकीचं शिक्षण घेऊन चांगल्या ठिकाणी काम मिळे या अपेक्षेने राजकुमार पुण्यात आला. पण, ही अपेक्षा फोल ठरली. तसं काही झालं नाही मग महाविद्यालयात केलेल्या नाटकातील कामामुळे कला क्षेत्राशी आवड असल्याने सुदर्शन, भारत, यशवंतराव चव्हाण या नाट्यगृहात आणि ललित कला केंद्रातली सातत्याने नाटकं पाहण्यास सुरवात केली. अतुल पेठे, सतीश आळेकार, अलोक राजवाडे आणि ललित कला केंद्र यांच्या नाटकांनी राजकुमारचा नाटकांकडे बघण्याचा दृष्टिकोण बदलला. त्यानंतर श्रीकांत प्रभाकर, प्रदीप वैद्य यांच्याकडे फिजिकल थिएटर आणि नाटक या विषयावर कार्यशाळा केल्या.

पुण्याविषयी कृतज्ञता व्यक्त करताना पुण्याने माझ्या सारख्या पाषाणातल्या कोऱ्या चिऱ्याला आकार दिलाय असे राजकुमार सांगतो. त्याचबरोबर, कला क्षेत्र हे अस्थिर असून करमणूक क्षेत्र जिवनावश्यक नसले तरी जिवनाचा अविभाज्य भाग आहे. आता रशियातील चित्रपटगृहांत हा चित्रपट प्रदर्शित होत असल्याने मोठा आनंद झाल्याची भावना त्याने व्यक्त केली.

loading image
go to top