
पुणे - स्वारगेट एसटी स्थानकात शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणात अटक केलेला आरोपी दत्तात्रेय गाडे याचा दुसरा जामीन अर्जही पुणे सत्र न्यायालयाने फेटाळला. आरोपीने महिलेविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला असून, या प्रकरणात आरोपपत्र दाखल केल्यानंतरही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही, असे निरीक्षण नोंदवीत न्यायालयाने जामीन फेटाळला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिरुद्ध गांधी यांनी हा निकाल दिला.