

Swargate-Katraj BRT Discipline Collapse
Sakal
धनकवडी : स्वारगेट ते कात्रजदरम्यानचा ‘बीआरटी’ मार्ग शहरातील सर्वाधिक वर्दळीचा व प्रवासी घनता असलेला मानला जातो. गेल्या काही महिन्यांपासून या मार्गावरील शिस्त ढासळत आहे. ‘बीआरटी’ मार्गातून इतर वाहने जाऊ नयेत म्हणून पूर्वी प्रशासनाचे कर्मचारी ठिकठिकाणी उभे असायचे. त्यांच्या उपस्थितीमुळे खासगी वाहनांवर काही प्रमाणात नियंत्रण राहत होते. परंतु, सध्या या ठिकाणी एकही कर्मचारी दिसत नाही.