स्विगीच्या डिलिव्हरी बॉइजचे आंदोलन सुरूच 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 23 September 2020

कॅम्प, कल्याणीनगर, कोरेगाव पार्क, विमाननगर आदींसह शहरांतील विविध भागांतून सुमारे सहा हजार तरुणांनी मंगळवारी काम बंद ठेवले होते. सोमवारच्या तुलनेत आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणांची संख्या वाढल्याने सेवेवर परिमाण झाला होता.

पुणे - कामाचा योग्य मोबदला देण्याच्या मागणीसाठी स्विगीच्या डिलिव्हरी देणाऱ्या तरुणांनी (डिलिव्हरी बॉइज) दुसऱ्या दिवशीदेखील कामबंद आंदोलन सुरूच ठेवले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कॅम्प, कल्याणीनगर, कोरेगाव पार्क, विमाननगर आदींसह शहरांतील विविध भागांतून सुमारे सहा हजार तरुणांनी मंगळवारी काम बंद ठेवले होते. सोमवारच्या तुलनेत आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणांची संख्या वाढल्याने सेवेवर परिमाण झाला होता. डिलिव्हरीचे दर वाढवावे, जुन्या कर्मचाऱ्यांना दर आठवड्याला देण्यात येणारा भत्ता पुन्हा सुरू करावा, अशा त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

याबाबत कंपनी प्रशासनाबरोबर आज (ता. 23) बैठक होणार आहे. त्यात होणाऱ्या निर्णयावरून आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल, असे आंदोलक अमित दाभाडे यांनी सांगितले. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Swiggy Delivery Boys movement continues