पुण्यात वाढतोय स्वाइन फ्ल्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

swine flu

पुणे शहरात कोरोनानंतर आता स्वाइन फ्ल्यूच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे.

पुण्यात वाढतोय स्वाइन फ्ल्यू

पुणे - ‘तोंडाला चव होती. वास येत होता. पण, सर्दी, खोकला झाला. दोन दिवसांनंतर ताप आला. वातावरणातील बदलांमुळे हे झालं असेल असं वाटलं. डॉक्टरांनी दिलेली औषधे चार-पाच दिवस घेतली. पण, बरं वाटत नव्हतं. कोरोनाची तपासणी केली. त्यानंतर डेंगी, हिवतापाची चाचणी केली. काहीच निदान नव्हते. अखेर स्वाइन फ्ल्यूची चाचणी केली. नेमकी ती पॉझिटिव्ह आली,’ कपड्याचे व्यापारी असलेले विकास खन्ना बोलत होते.

पुणे शहरात कोरोनानंतर आता स्वाइन फ्ल्यूच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. कोरोना उद्रेकाच्या गेल्या तीन वर्षांमध्ये पुण्यात स्वाइन फ्ल्यूचे ४७४ रुग्ण आढळले. या वर्षी कोरोनाचा उद्रेक कमी झाल्यानंतर गेल्या आठ महिन्यांमध्ये स्वाइन फ्ल्यूच्या रुग्णांची संख्या ५४० झाली. त्यामुळे स्वाइन फ्ल्यूचा गेल्या तीन वर्षांतील मोठा उद्रेक असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.

वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. पी. बी. तांबे म्हणाले, ‘देशात कोरोनाचा सर्वाधिक उद्रेक पुण्यात होता. रोज शेकड्यांनी रुग्णांची नोंद होत होती. या उद्रेकामुळे स्वाइन फ्ल्यूच्या ‘एच१एन१’ या इन्फ्लूएंझा प्रकारच्या विषाणूंचा संसर्ग कमी झाला होता. त्यामुळे रुग्णसंख्या कमी होती. पण, आता कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाला. तसेच, वातावरणात वेगाने बदल झाले. त्यामुळे या विषाणूंचा संसर्ग पुन्हा वाढत आहे.’

डॉ. दत्तात्रेय जोशी म्हणाले, ‘थंडी आणि पावसाळ्यात विषाणूजन्य आजारांचे प्रमाण वाढते. आता स्वाइन फ्ल्यूच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. ताप, सर्दी, खोकला अशा प्राथमिक लक्षणे असलेल्या रुग्णांची पहिली चाचणी कोरोनाची केली जाते. ती निगेटिव्ह आल्यानंतर स्वाइन फ्ल्यूची करण्याकडे आला वैद्यकीय तज्ज्ञांचा कल वाढला आहे.’

असा वाढला स्वाइन फ्ल्यू

वर्ष ................ रुग्णसंख्या

२००९ ............. १,४९५

२०१० ............. १,६५५

२०११ ............. २१

२०१२ ............. ७३०

२०१३ ............. २७५

२०१४ ............. ३५

२०१५ ............. १,१२६

२०१६ ............. २९

२०१७ ............. ७०३

२०१८ ............. ५९२

२०१९ ............. १७५

२०२० ............. १०

२०२१ ............. २८९

२०२२ ............. ५४०

Web Title: Swine Flu Increase In Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :puneswine fluhealth