पुणे - ‘कृत्रिम बुद्धीमत्तेचा (एआय) कृषी क्षेत्रात उपयोग करण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. शेतीच्या प्रत्येक टप्प्यावर या तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना उपयोग होणार असून त्यांचे जीवन अधिक सुकर होईल. राज्य सरकारने एआय चॅटबॉट्स तयार केले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांना कळेल, त्या भाषेत शंकांचे समाधान होऊ शकणार आहे.