पुणे : परदेशातून आलेल्या तिघांमध्ये लक्षणे

Corona-Danger
Corona-Danger

सुमारे २०३ नागरिक परतले; २५ जणांची स्वतःहून तपासणी
पुणे - ट्रॅव्हल कंपन्यांकडून १ मार्चपासून परदेशी जाऊन आलेल्या नागरिकांची माहिती जिल्हा प्रशासनाला मिळाली आहे. यात सुमारे २०३ नागरिकांचा समावेश असून, त्यापैकी तीन जणांमध्ये कोरोना संसर्गाची लक्षणे आढळून आली आहेत. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी रविवारी दिली.

कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये आढळून आले आहेत. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहे. यापैकी बहुसंख्य रुग्ण हे परदेशवारी करून आले असल्याचे दिसून आले आहे. या पार्श्‍वभूमीवर दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी शहरातील सर्व टूर आणि ट्रॅव्हल कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली होती. त्यामध्ये एक मार्चपासून परदेशात जाऊन आलेल्या नागरिकांची माहिती तत्काळ जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करून देण्याची सूचना देण्यात आली होती.

याबाबत जिल्हाधिकारी राम म्हणाले, ‘‘परदेशातून १ मार्चपासून सुमारे २०३ नागरिक आले आहेत. त्यापैकी २५ जणांनी स्वत:हून डॉ.नायडू रुग्णालयात तपासणी करून घेतली आहे. परदेशातून आलेल्या तीन जणांमध्ये या विषाणूचा लक्षणे दिसून आली आहेत. त्या सर्वांना घरीच विलगीकरण कक्षात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर प्रशासन लक्ष ठेवून आहे.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com