esakal | पुणे : कोरोना योद्धांची तहसीलदाराने काढली अक्कल; वाचा सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

Corona-Warriors

लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिकेला आज शनिवार (ता.११) रोजी कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी इंदापूरला घशातील द्रवाचे नमुने (स्वॉब) देण्यासाठी गेले होते.  त्यांना उशीर झाल्याने परत पाठविण्यात आले. मात्र आज सकाळीच काही कर्मचाऱ्यांनी बारामतीमध्ये स्वाॅब दिला होता. इंदापूरचे पेशंट बारामतीला गेलेच का ? या कारणावरुन तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ.पूनम गुडले व आरोग्य विभागील कर्मचाऱ्यावर भडकल्या.

पुणे : कोरोना योद्धांची तहसीलदाराने काढली अक्कल; वाचा सविस्तर

sakal_logo
By
राजकुमार थाेरात

वालचंदनगर - तालुका वैद्यकीय अधिकारी (टीएचओ)  शहाणी नाही...तिला अक्कल नाही...तिने तालुक्यातील डॉक्टरांना पोसलय...माजलेत सगळे साले.... हे शब्द आहेत इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांचे... इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी इंदापूर तालुक्यातील आरोग्य विभागातील कोराेना योद्धांची अक्कल काढून  लासुर्णे  प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिला वैद्यकीय अधिकारी डॉ.पूनम गुडले यांच्याशी अरेरावीची भाषा वापरल्याचा धक्कादायक प्रकार आज लासुर्णे गावामध्ये घडला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिकेला आज शनिवार (ता.११) रोजी कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी इंदापूरला घशातील द्रवाचे नमुने (स्वॉब) देण्यासाठी गेले होते.  त्यांना उशीर झाल्याने परत पाठविण्यात आले. मात्र आज सकाळीच काही कर्मचाऱ्यांनी बारामतीमध्ये स्वाॅब दिला होता. इंदापूरचे पेशंट बारामतीला गेलेच का ? या कारणावरुन तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ.पूनम गुडले व आरोग्य विभागील कर्मचाऱ्यावर भडकल्या. त्यांनी गुडले यांच्याशी अरेरावीची भाषा करुन तु माझ्या बापाची नोकरी करत नाही,तुला ऐकून घ्यावेच लागले.ऐकायची सवय ठेव.तालुका वैद्यकीय अधिकारी शहाणी नाही.तिला अक्कल नाही. तिने असल्या डॉक्टरांना पोसलय. माजलेत सगळे साले.अशी अरेरावीची भाषा वापरल्याची धक्कादायक प्रकार लासुर्णेमध्ये घडला.   डॉ.पुनम गुडले व कर्मचाऱ्यांनी जिल्हा आरोग्यअधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे तहसीलदार यांची तक्रार केली आहे.

हवेलीकरांसाठी २५० बेड उपलब्ध होणार अन्...

कोरोना योद्धांची अक्कल काढण्याचा प्रकार धक्कादायक...
इंदापूरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.आजपर्यंत तालुक्यामध्ये ४८ कोरोना रुग्ण सापडले असून यातील ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.२१ रुग्ण बरे झाले असून २४ रुग्णावरती उपचार सुरु आहेत.इंदापूर तालुक्यातील आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी स्वत:चा जीव धाेक्यात घालून कोरोनाशी लढा देत आहेत.

सायबर पोलिसांचा करिष्मा; ऑनलाईन फ्रॉड झालेल्या कॉसमॉस बँक आणि नागरिकांचे पैसे केले परत!

सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवून काेरोनापासुन मुक्त करण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरु आहे.लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परीसरातील बोरी,जंक्शन व कळंब (लालपुरी) व लासुर्णे मध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहे हा कन्टेंमेंट झोन असून या परीसरीतील नागरिकांचा सर्वेक्षण करण्याचे काम आरोग्य विभागातील कर्मचारी करीत असून कोरोना योद्धांची अक्कल काढण्याचा प्रकार धक्कादायक आहे. 

अक्कल हा शब्द बोलले नाही... - मेटकरी
यासंदर्भात इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, डॉक्टरांना वरिष्ठांशी कसे बोलायचे हे माहिती नाही. मी अक्कल हा शब्द  काढलेला नसल्याचा त्यांनी खुलासा केला.

Edited By - Prashant Patil