Kalyani Nagar Accident : उशिरा चालणाऱ्या पब, बारवर कारवाई करा;रात्री पोलिसांनी गस्त घालण्याचीही राजकीय पक्षांची मागणी

कल्याणीनगरमध्ये मद्यपान करून आलिशान मोटारीची धडक देऊन बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने दोघांना चिरडण्याच्या घटनेचे पडसाद राजकीय क्षेत्रातही उमटले आहेत.
Kalyani Nagar Accident
Kalyani Nagar Accidentsakal

कल्याणीनगरमध्ये मद्यपान करून आलिशान मोटारीची धडक देऊन बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने दोघांना चिरडण्याच्या घटनेचे पडसाद राजकीय क्षेत्रातही उमटले आहेत. उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या पब-बारवर तातडीने कारवाई करावी, शहरातील प्रमुख रस्त्यांवर रात्री पोलिसांनी नियमितपणे तपासणी करावी, अनेक पब-बार बेकायदा असून त्यावर कारवाई करावी अशा मागण्या सोमवारी विविध राजकीय पक्षांच्या नेते-कार्यकर्त्यांनी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे केल्या.

महायुतीतर्फे मुरलीधर मोहोळ, प्रदीप देशमुख, अजय भोसले, योगेश टिळेकर, गणेश बिडकर, लतीफ शेख, डॉ. सिद्धार्थ धेंडे, हर्षदा फरांदे, संदीप खर्डेकर, राजेश येनपुरे आदींच्या शिष्टमंडळाने पोलिस आयुक्तांची भेट घेतली. रात्री बेदरकारपणे गाडी चालविणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अपघात प्रकरणातील मुख्य आरोपीवर गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करावा, पब-बार यांचे परवाने आणि प्रत्यक्षातील कारवाई याची काटेकोर तपासणी करावी, त्यासाठी महापालिकेची मदत घ्यावी असा मागण्या त्यांनी केल्या. शहरातील अनेक भागांत पानटपऱ्या, आइस्क्रीम पार्लर व चायनीज खाद्यपदार्थांच्या गाड्या रात्रीही सुरू असतात. काही टपरीचालक गाड्या वेळेत बंद करतात, काहीजण रात्री बारापर्यंत दुकान थाटून बसतात. त्यामुळे पोलिस, महापालिकेने कारवाई करावी, असेही त्यांनी नमूद केले.

Kalyani Nagar Accident
Kalyani Nagar Accident : पबचा बाजार अन् जनता बेजार;मुंढवा, कोरेगाव पार्क, कल्याणीनगर, येरवडा परिसरात सुमारे ७० पब

महिला काँग्रेसचेही निवेदन

बिटीया फाउंडेशन, महिला काँग्रेसतर्फे संगीता तिवारी, सुजाता शेट्टी, पूनमीत तिवारी यांनी पोलिस आयुक्तांना निवेदन दिले. ‘पब रात्री १.३० वाजता बंद करण्याचे आदेश आहेत, मग १.३० वाजता मद्य कसे दिले गेले ?रात्रभर सुरू राहणाऱ्या पबवर राज्य उत्पादनशुल्क विभाग काही कारवाई करीत नाही का ? नंबरप्लेट नसलेली मोटार रस्त्यावर कशी फिरू शकते ?‘आरटीओ’चे अधिकारी काय करीत होते ? त्या पबमध्ये १६ वर्षांच्या मुला-मुलींना मद्य कसे दिले जाते ? पोलिसांनी आरोपीला तत्परतेने सहकार्य का केले ?, ’ असे सवाल या निवेदनाद्वारे करण्यात आले.

शहरातील पब आणि बारच्या वेळा बदलून त्या अलीकडे आणाव्यात. प्रमुख रस्ते आणि चौकांत रात्री पोलिसांची गस्त वाढवावी, मद्यप्राशन करून वाहने चालविणाऱ्यांवर कारवाई करावी, पुण्यातील ‘नाईट लाईफ’ला विपरीत वळण लावणाऱ्या घटकांवर कडक आणि नियमितपणे कारवाई करावी. या प्रकरणी आरोपीला तत्काळ जामीन कसा मिळाला, आरोपीला पोलिसांनी कोठडीत ठेवण्याऐवजी त्याला सहकार्य कसे केले याचीही कसून खात्यांतर्गत चौकशी करावी.

- रवींद्र धंगेकर, आमदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com