'अनधिकृत'च्या अहवालास विलंब करणाऱ्यांवर कारवाई 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 जानेवारी 2020

पिंपरी : अनधिकृत बांधकामांचा अहवाल पाठविण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या दहा बीट निरीक्षकांसह खातेनिहाय चौकशीस विलंब करणाऱ्या तीन अधिकाऱ्यांवर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दंडात्मक कारवाई केली. प्रत्येकी 500 रुपये दंड ठोठावला असून नजीकच्या वेतनातून तो वसूल केला जाणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

उपअभियंता लक्ष्मीकांत कोल्हे, मीटर निरीक्षक सूर्यकांत फड, सिद्धार्थ जोगदंड, योगेश रानवडे, आरोग्य निरीक्षक राकेश सौदाई, सचिन जाधव, मकरंद पानसे, भीमराव कांबळे, मुख्य लिपिक सदाशिव सुभेदार, रवींद्र भाट अशी दंडात्मक कारवाई केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडे बीट निरीक्षकपदाचा अतिरिक्त पदभार आहे. तसेच खातेनिहाय चौकशीस दिरंगाई करणारे लिपिक अविनाश गायकवाड, वायरलेस ऑपरेटर बी. के. पानमंद आणि विनायक शेवतीकर यांच्यावरही दंडात्मक कारवाई केली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: take action on officers regarding illegal constructions