खासगी क्‍लासेसवर कारवाई करा; मनसे विद्यार्थी सेनेची मागणी  

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 26 November 2019

शहरातील बनावट इन्स्टिट्यूट आणि खासगी क्‍लासेसमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जात आहे. स्वच्छतागृहे नसल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. अशा क्‍लासेसवर करवाई करावी, अशी मागणी मनसे विद्यार्थी सेनेने केली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना दिले. 

पुणे - शहरातील बनावट इन्स्टिट्यूट आणि खासगी क्‍लासेसमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जात आहे. स्वच्छतागृहे नसल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. अशा क्‍लासेसवर करवाई करावी, अशी मागणी मनसे विद्यार्थी सेनेने केली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना दिले. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

गुजरातमध्ये खासगी क्‍लासमध्ये लहान मुलीवर लैंगिक अत्याचार झाला होता. पुण्यात मोठ्या प्रमाणात खासगी क्‍लास, ट्यूशन, बनावट इन्स्टिट्यूट आहेत. त्यांच्यावर कोणतेही नियंत्रण नाही. तेथे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेतली जात नाही. अनेक क्‍लासमध्ये, संस्थांत परप्रांतीय व दुसऱ्या शहरातून आलेले शिक्षक आहेत. त्यांची चारित्र्य पडताळणी झालेली नाही. आठ-आठ तास विद्यार्थ्यांना क्‍लासमध्ये बसविले जाते. पण, तेथे स्वच्छतागृहांची व्यवस्था नाही. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होत आहे. तरीही, क्‍लासचालक याकडे दुर्लक्ष करीत आहेत. पोलिस आणि शिक्षण विभागाने अशा सर्व क्‍लास व इन्स्टिट्यूटची तपासणी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी राम यांच्याकडे जिल्हाध्यक्ष प्रशांत कनोजिया, राज्य कार्यकारी सदस्य शैलेश विटकर, रूपेश घोलप यांनी केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Take action on private classes Demand for MNS Student