lockdown : घराबाहेर पडताय;  पण घरच्यांना सांभाळा !

lockdown : घराबाहेर पडताय;  पण घरच्यांना सांभाळा !

पुणे - घराबाहेर म्हणजे, रस्त्यावर पायही ठेवायचा नाही...तरीही कोरोना आपली सोडेनासे झालायं...रोज शंभरांनी रुग्ण वाढतायेत...आता काय करायचं ?...ज्यामुळं कोरोना आटोक्‍यात येईलं...त्यावरचा उपाय सापडलाय...तो साधा असला तरी "इलाज' करण्यासारखाय...हा रामबाण उपाय म्हणजे, तुम्हाला घरीही सोशल डिस्टन्सिंग पाळायचयं...अर्थात, लंच, डिनरपासून अगदी घरात कॅरम खेळणं... पत्त्यांच्या डाव मांडणं...अशा प्रकारचा "लॉकडाउन एन्जॉय' थांबवावा लागेल ! कारण; एकूण रुग्णांपैकी 71 टक्के नागरिकांत घरातूनच कोरोना पसरलाय...तर किराणा, भाजी खरेदीमुळे दहा टक्के रुग्ण सापडलेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ही टक्केवारी संख्येत मांडायची झाली तर; एकूण 5 हजार 427 रुग्णांपैकी 4 हजार 18 जणांना घरातल्या सपंर्कातून आणि 497 रुग्णांना परिसरातून संसर्ग झाला आहे. परिणामी, पुणेकरांना आता घरातही खूपच काळजी घ्यावी लागणार असल्याची बाब आधोरेखित करीत आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पुणे शहरात कोरोना वाढत असून, सध्या रोज दिवसाकाठी सरासरी दीडशेहून अधिक रुग्णांची भर पडत आहे. त्यावर निरनिराळे उपाय केले जात असले तरी, नव्या रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाहीत. त्यामुळे कोरोनाचा आवाका वाढण्याची कारणे शोधून त्यावरच नेमके उपाय करण्याची भूमिका महापालिकेने घेतली आहे. त्यातून घरातील जवळीकतेमुळे रुग्ण संख्येत मोठी भर पडल्याचे पुढे आले आहे. भवानी पेठेतील मंजुळाबाईत चाळीत पत्ता खेळण्यातून काही मुले कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आल्याचे उदाहरण आहे. 

घराभोवतीच्या पाचशे मीटर भागांतही कोरोनाचा ससर्ग वाढत असल्याचे पुढे आले आहे. विशेषत: खरेदीसाठी म्हणजे, भाजी, दूध, किराणा साहित्य खरेदी करताना आलेल्या लोकांच्या सपंर्काचा परिणाम ही संख्या वाढण्यात येत आहे. त्यामुळे सर्वाधिक ससंर्ग होण्यामागे हीच कारणे असल्याने कोरोनाचा धोका वाढत आहेत, असेही निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

""पुणेकरांनी घरातदेखील सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची शिस्त लावायला हवी. मात्र, आतापर्यंत तसे न झाल्याने सर्वाधिक संसर्ग हाच घरातील व्यक्तींमध्ये झाला आहे. त्यावरचा उपाय म्हणजे, प्रत्येकाची जबाबदारीच आहे. ती सांभाळल्यास काही प्रमाणात का होईना पण कोरोना मर्यादित राहील. '' 
रुबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त महापालिका 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com