पावसाळ्यात घ्या ‘लेप्टो’ची खबरदारी; आरोग्य विभागाचा सल्ला

साचलेल्या दूषित पाण्यामुळे वाढतो धोका
Leptospirosis
Leptospirosissakal

पुणे : जिल्ह्यासह राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे जागोजागी पावसाचे पाणी साचले आहे. अशा दूषित पाण्यामध्ये गेल्यामुळे ‘लेप्टोस्पायरोसिस’ (Leptospirosis) या जीवाणूजन्य आजाराची लागण होण्याची शक्यता पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने वर्तविण्यात आली आहे. (Take care Leptospirosis rainy season say pune corporation health deparment)

जनावरांत आढळणाऱ्या ‘लेप्टोस्पायरा’ या रोगजंतू मुळे हा आजार होतो. उंदीर, घुशी आदी प्राण्यांच्या अंगावर असलेले हे रोगजंतू पावसात पाण्याबरोबर वाहून येतात. अशा दूषित पाण्याच्या डबक्यात गेल्यावर या आजाराची शक्यता निर्माण होते. प्रामुख्याने पाळीव प्राणी तसेच शेतात काम करणाऱ्या व्यक्तींना आजार होण्याची शक्यता जास्त असते. भात शेती करणारे शेतमजूर तसेच कत्तलखान्यातील कामगार, मासेमार व्यक्तींमध्ये या रोगाचे विशेष लक्षणे किंवा लागण होते. तसेच शहरात झोपडपट्टी परिसरातील किंवा सखल भागात साचलेल्या पाण्याशी संपर्क आल्यास या आजाराचा धोका संभवतो. आजाराची तीव्रता वाढल्यास मूत्रपिंडाचे आणि यकृताचे काम बंद पडून मृत्यू ही ओढवू शकतो.

Leptospirosis
पुणे : ‘पीएमआरडीए’चा ‘डीपी’ लांबणीवर

काय आहे लेप्टोस्पायरोसिस :

लेप्टोस्पायरोसिस हा प्रामुख्याने जनावरांत आढळणारा संसर्गजन्य आजार आहे. लेप्टोस्पायरा या जीवाणूंच्या २३ प्रजाती आहेत. लेप्टोस्पायरोसिस आजार विशिष्ट हंगामामध्ये प्रामुख्याने पावसाळ्याच्या सुरवातीला आणि शेवटी काही प्रमाणात या आजाराचे रुग्ण दिसून येतात.

असा होतो संसर्ग..

बाधित प्राण्यांच्या मुत्रामुळे दूषित झालेला परिसर हा या आजाराचे प्रमुख स्रोत आहे. संसर्ग झालेल्या जनावरांच्या मूत्र, रक्ताचा प्रत्यक्ष संपर्क आल्याने या आजाराचा प्रसार होतो. शरीरावरील जखम अथवा नाक डोळे यांच्यामार्फत जंतू मानवी शरीरामध्ये प्रवेश करतात.

Leptospirosis
पुणे : अडीचशे खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्ती

लक्षणे -

  • तीव्र ताप

  • डोकेदुखी, स्नायू दुखी

  • थंडी वाजणे

  • डोळे सुजणे

  • रक्तातील प्लेटलेट्स कमी होणे

काय काळजी घ्याल..

  • पावसाळी पाण्याच्या साचलेल्या डबक्यात जाऊ नये

  • दूषित पाणी, माती किंवा भाज्यांचे मानवी संपर्क टाळणे

  • संपर्क येऊ नये यासाठी पदवेश, हातमोजे वापरावेत

  • प्राण्यांच्या मूत्रामुळे पाण्याचेसाठे दूषित होऊ नये यासाठी काळजी घेणे

  • पावसात भिजून आल्यास हात, पाय स्वच्छ साबणाने धुवा

Leptospirosis
आरोग्य विभागात रिक्त पदे कधी भरणार?

पुणे महापलिकेचे सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव डॉ. संजीव वावरे यांनी सांगितले, "गेल्या काही दिवसांच्या पावसामुळे शहरात विविध ठिकाणी पाणी साचले आहे. अशा दूषित पाण्याच्या संपर्कात आल्यामुळे व्यक्तीला लेप्टोस्पायरोसिस हा आजार होण्याची शक्यता आहे. पावसाळ्याच्या दृष्टीने योग्य ती काळजी घेणे आवश्यक असून, असा संशयित रूग्ण आढळल्यास तातडीने आरोग्य विभागाला कळवावे."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com