esakal | कोरोनाबाधित रुग्णांबाबत उपमुख्यमंत्र्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले निर्देश, म्हणाले...
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit_Pawar

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे, ही समाधानाची बाब आहे. मात्र कोरोनाचा संसर्ग रोखण्यासोबतच्या उपाययोजनाबरोबरच कोरोनाबाधित रुग्णाला वेळेवर उपचार मिळतील, याबाबत दक्षता घ्यावी.

कोरोनाबाधित रुग्णांबाबत उपमुख्यमंत्र्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले निर्देश, म्हणाले...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोनाचा संसर्ग (Corona Spread) रोखण्यासाठी काटेकोर नियोजन करणे, मृत्यू दर कमी ठेवणे, चाचण्यांची संख्या वाढवून रुग्णांवर वेळीच उपचार करणे तसेच इतर आजार असणाऱ्या व्यक्तींना वेळीच ओळखून त्यांच्यावर उपचार करावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रशासनाला दिले. गंभीर रुग्णांना बरे करण्यासाठी प्लाझ्मा थेरपी (Plasma Therapy) उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पुणेकरांनो, उद्या भोरच्या भटकंतीची प्लॅन विसरा

विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता.१४) कोरोनाच्या उपाययोजनांबाबत आढावा बैठक पार पडली. महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, प्रभारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

Independence Day 2020: देशाटनातून मातीशी नातं घट्ट करणारा कर्नल!

पवार म्हणाले, पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे, ही समाधानाची बाब आहे. मात्र कोरोनाचा संसर्ग रोखण्यासोबतच्या उपाययोजनाबरोबरच कोरोनाबाधित रुग्णाला वेळेवर उपचार मिळतील, याबाबत दक्षता घ्यावी. कोरोना विषाणूची भीती घालविण्यासाठी तसेच याविषयी जनसामान्यांमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती होण्यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

कोरोनाच्या तडाख्यातून सावरतेय ऑटो इंडस्ट्री; वाहन खरेदीचा वेग वाढला

कोरोना संसर्गातून गंभीर रुग्णांना बरे करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा उपयोग होत आहे. प्लाझ्मा दान करण्याबाबत जनजागृती करावी. कोरोनाविरूध्द लढाई नक्की जिंकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रारंभी विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी कोरोना बाधित रुग्ण, नमुना तपासणी प्रयोगशाळा, बाधित रुग्ण, मृत्यूचा तपशील, कोरोना मुक्त झालेले रुग्ण, संपर्क व्यक्ती शोधणे, अनुमानित कोरोना रुग्ण व नियोजित बेड्स, रुग्णवाहिका उपलब्धता याबाबत माहिती दिली. जम्बो रुग्णालय उभारणीचे काम गतीने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image