नवरात्रोत्सवात घ्या विशेष काळजी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 20 October 2020

उत्सव काळात नागरिकांच्या अनावश्‍यक गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्‍यता आहे. चातुर्मास आणि नवरात्रामध्ये महिलांनी नियमांच्या पालनाकडे लक्ष देण्याची गरज आहे.

पुणे - लॉकडाउनचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर तब्बल आठ महिन्यांनी प्रथमच उत्सव म्हणून नवरात्री साजरी होत आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर मानसिक समाधानासाठी हा कौटुंबिक उत्सव साजरा करण्याची संधी मिळत आहे. असे असले तरी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्याकडे विशेष लक्ष द्यायला हवे, असे मत डॉक्‍टरांनी व्यक्त केले आहे.

उत्सव काळात नागरिकांच्या अनावश्‍यक गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्‍यता आहे. चातुर्मास आणि नवरात्रामध्ये महिलांनी नियमांच्या पालनाकडे लक्ष देण्याची गरज आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

धार्मिक आयोजनामध्ये सार्वजनिक आणि वैयक्तिक स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. बाहेर खरेदीहून आल्यावर कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर योग्य ती खबरदारी घेणे, वस्तूंचे निर्जंतुकीकरण करणे, नियमित हातपाय स्वच्छ धुणे, मास्क घालणे आदी गोष्टींचे पालन आवश्‍यक आहे. खाद्यपदार्थ, आरासाचे साहित्य, पूजेचे साहित्य आदींची स्वच्छता राखावी.

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

अनावश्‍यक धार्मिक विधींना शक्‍यतो बगल देण्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करतात. शारीरिक अंतर पाळणे, मोजक्‍या लोकांमध्ये धार्मिक विधींचे आयोजन करणे, या काळात ज्येष्ठांची विशेष काळजी घेणे, सार्वजनिक आणि गर्दीच्या धार्मिक कार्यक्रमाला जाणे शक्‍यतो टाळावे. गरज असेल तरच घराबाहेर पडा. उपवासांचे पालन करताना योग्य आहार आणि आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लॉकडाउनचे नियम शिथिल झाले म्हणजे कोरोना गेला असे नाही. मागील सात महिन्यांत सक्तीने का होईना लागलेल्या स्वच्छतेच्या सवयी यापुढेही पाळणे आवश्‍यक आहे. धार्मिक कार्यक्रमांमुळे महिलांनी मासिक पाळी रोखणाऱ्या प्रतिबंधात्मक गोळ्या घेणे टाळावे.
- डॉ. वैजयंती पटवर्धन, स्त्रीरोगतज्ज्ञ आणि सार्वजनिक आरोग्यावरील वैद्यकीय संशोधक

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Take special care during Navratri