

Farmers turn to beehives as natural bees decline
sakal
संजय बारहाते
टाकळी हाजी : वाढत्या जंगलतोड, रासायनिक फवारण्या आणि हवामानातील असमतोलामुळे नैसर्गिक मधमाशा दुर्मिळ झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकरी आता मधमाशांच्या पेट्या विकत घेऊन बागेत ठेवण्याचा नवा प्रयोग करत आहेत. त्यामुळे फळधारणेत लक्षणीय वाढ होत असून, फुलांची गळती कमी झाली आहे. शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी परिसरात हजारो हेक्टर क्षेत्रावर डाळिंब पिकाची लावगड झाली आहे.