Chakan News : तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाचे 'बीओटी' तत्त्वावर काम लवकरच सुरू होणार; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे आश्वासन
चाकण येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न हा मोठा आहे. त्यामुळे उद्योग, कंपन्या यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. या मार्गामुळे कामगारांचे जीव जात आहेत.
चाकण - तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाचे काम एमएसआयडीसीच्या वतीने करण्यात येणार आहे. परंतु हे काम बीओटी तत्त्वावर एका कंपनीच्या वतीने करण्यात येणार आहे. त्यासाठीच्या निविदा लवकरच खुल्या होतील.